Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Vidhansabha Election Update : पुणे जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला प्रचंड झुंज द्यावी लागत आहे.
Shivsena UBT Group
Shivsena UBT GroupAgrowon
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपांमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला प्रचंड झुंज द्यावी लागत आहे. जिल्ह्यातील पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ (निम्मा) लोकसभा मतदारसंघातील २१ विधानसभा मतदारसंघात एकही जागा मिळत नसल्याचे शिवसैनिक हतबल झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये अस्वस्थता असून, पदाधिकाऱ्यांनी प्रसंग शड्डू ठोकण्याची भूमिका घेतली आहे.

पुणे जिल्ह्यात पुणे लोकसभा मतदारसंघात कोथरूड, वडगावशेरी मतदारसंघासाठी शिवसेना आग्रही होती. मात्र वडगावशेरी मध्ये महाविकास आघाडीने राष्ट्रवादीने प्रबळ दावा केला केल्याने शिवसेनेची पीछेहाट झाली आहे. तर कोथरूड मतदारसंघात माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांच्या नावाची चर्चा शिवसेनेकडून सुरू आहे. मात्र कोथरूड सारख्या भाजपाच्या तुल्यबळ मतदारसंघात शिवसेना कितपत लढत देऊ शकेल, असा देखील प्रश्‍न आहे.

Shivsena UBT Group
Maharashtra Assembly Election : अहिल्यानगरला आचारसंहिता भंगाच्या ३९ तक्रारी दाखल

मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ हे तीन मतदारसंघ पुणे जिल्ह्यात येतात. यामध्ये देखील तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे शिवसेनेची पीछेहाट झालेली दिसत आहे. मावळ मतदारसंघात शिवसेना फुटीच्या अगोदर दिवंगत खासदार गजानन बाबर यांचे वर्चस्व होते. यानंतर या मतदारसंघावर सध्या शिवसेना (शिंदे गटाचे) श्रीरंग बारणे यांचे वर्चस्व आहे. बारामती मतदारसंघात एकही जागा शिवसेनेला मिळाली नाही.

Shivsena UBT Group
Maharashtra Assembly Election : नवाब मलिक प्रतीक्षेत, संजय पाटील, टिंगरेंना संधी

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या पारंपरिक आणि हक्काच्या असलेल्या जुन्नर, खेड-आळंदी, भोसरी आणि हडपसर मतदारसंघासाठी शिवसेना आग्रही होती. मात्र या ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रबळ दावे केल्याने या ठिकाणचे उमेदवार अद्यापही जाहीर करण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश आलेले नाही. या मतदारसंघात शिवसेना आक्रमक झाली असून, जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड आणि सुरेश भोर यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

लोकसभेला शिवसेनेने प्रामाणिकपणे काम करत कोल्हे यांना विजयी केले. प्रचारा दरम्यान खा. कोल्हे यांनी शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत मानाचे पान दिले जाईल असा शब्द दिला होता. तर शिवसैनिक पेटत नाही आणि पेटला तर विझत नाही असे म्हणत शिवसैनिकांना प्रोत्साहन दिले होते. या दोन्ही वाक्यांची आठवण शिवसेनेने खा. कोल्हे यांना करून दिली आहे. यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील संघर्ष अधिक पेटला आहे. खेड आणि जुन्नरसाठी आग्रही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जुन्नरमध्ये रविवारी (ता. २७) निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com