Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीन जिल्ह्यांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. जिल्ह्यातील १७ मंडलांत अतिवृष्टी झाली. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यातील सहा, बीडमधील एक व नांदेडमधील दोन मिळून चार जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली.

पावसाचा जोर कमी होण्याचे नाव घेत नाहीय. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सरासरी ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात सर्वाधिक सरासरी ६३.३ मिलिमीटर पाऊस झाला.

त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ५१.७ मिलिमीटर, गंगापूरमध्ये ४८.३ मिलिमीटर, सोयगावमध्ये ४७.२ मिलिमीटर, पैठणमध्ये ३५.७ मिलिमीटर, फुलंब्री ३६.५ किलोमीटर, खुलताबादमध्ये ३४.५ मिलिमीटर, तर कन्नड तालुक्यात सरासरी २६.३ मिलिमीटर, इतक्या पावसाची नोंद झाली.

जालना जिल्ह्यात सरासरी २४.७ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात सर्वदूर हलका ते जोरदार पाऊस झाला. बीड जिल्ह्यात दोन मंडळ वगळता सरासरी १३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली पावसाचे प्रमाण तुरळक, हलके, मध्यम तर काही ठिकाणी दमदार स्वरूपाचे राहिले.

जिल्हानिहाय अतिवृष्टीची मंडले (पाऊस मिलिमीटरमध्ये)

जालना जिल्हा

धावडा ७३.५, जाफराबाद ६८, टेंभुर्णी ८०, दाभाडी ६८, ढोकसाळ ९३, वाघृळ ७०.५

बीड जिल्हा

पाटोदा ७२

छत्रपती संभाजीनगर जिल्हा

छत्रपती संभाजीनगर ६५, भावसिंगपुरा ७१, लाडसावंगी ८९.२५, हरसुल ७८.५०, चौका ६७.२५, बालानगर ६५, मांजरी ६९.५०, शेंदूरवादा ६७.७५, वैजापूर ९७.२५, महालगाव ८३.२५, नागामठाण ७४.५०, लाडगाव ९७.२५, घायगाव ९७.२५, बाबतारा ११०.२५, अंभई ६७.७५, बनोटी ८०.७५, पिरबावडा ७७.२५.

जिल्हानिहाय मंडले व पाऊस (मिलीमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर जिल्हा

उस्मानपुरा २७.५, कांचनवाडी २५.३, चिकलठाणा ५२.५, चित्ते पिंपळगाव ३७, करमाड २५, कचनेर ४३.८, पंढरपूर १६, पिसादेवी ६३.३, शेकटा ५०.३, वरुडकाजी ६३.३, आडुळ ३९.३, पिंपळवाडी १०, नांदर ३०.५, लोहगाव २६ ढोरकीन ४०.८, बिडकीन ५७.३, पैठण ६१.३, विहामांडवा १७.८, आपेगाव १३.५, निलजगाव ५७.३, गंगापूर ५७.८, भेंडाळा १६, तुर्काबाद ६१.८, वाळूज २४.५, हरसुल ५५.८, डोनगाव ४४.५, सिद्धनाथ वडगाव ४१.५, आसेगाव ४९.३, गाजगाव ३३.८, जामगाव ५७.८, खंडाळा ३९.३, शिऊर ३९.३, बोरसर ३९.३, लोणी २९, गारज ४१.८, लासुरगाव ३७.५, जानेफळ ३६.५, कन्नड २४.८, देवगाव ४७, पीशोर २४.५, नाचनवेल १५.३, चिंचोली ३७.८, करंजखेड ३७.८, नागद १७.३, वेरूळ २१.५, सुलतानपूर ३९.५, बाजार सावंगी ४२.५, सिल्लोड ३७.३, भराडी ३८.३, गोळेगाव ६२.५, अजिंठा ४१.८, आमठाणा १५.३, बोरगाव १५.३, पालोद ६३.३, शिवना ५२.८, उंडनगाव ६२.५, सोयगाव ३२, सावलदबारा ४३, जरंडी ३२.८, फुलंब्री ६२, आळंद १५.५ वडोद बाजार २१.

जालना जिल्हा

भोकरदन १२.३, सिपोरा १२.८, हसनाबाद ३३, राजूर ३४, केदारखेडा १८.८, माहोरा १२.८, कुंभारझरी ४५.५, वरूड बु. २७.५, जालना शहर ३९.५, जालना ग्रामीण १३.५, शेवली ११.८, विरेगाव १३.३, अंबड ४७, धनगर पिंपरी ३८.३, जामखेड २१, रोहिलागड २१, वडिगोद्री १२, वाटूर १६.८, बदनापूर ३५.३, शेलगाव १३.८,बावणे पांगरी ३५.८, रोशनगाव १८.३, राणी उंचेगाव १२.८, तीर्थपुरी २०.३, अंतरवाली १०.३, रांजणी २३.३, जामसमर्थ १७, तळणी ४९.८.

बीड जिल्हा

पाली १०.५, राजुरी नवगन १२.३, पिंपळनेर १२.८, चौसाळा १०.३, आष्टी १०, कडा ३२.५, टाकळसिंग १४.५, धामणगाव १७, धानोरा १८, मादळमोही ११.५, पाचेगाव २६.५, चकलांबा २१.३, तालखेड ११.५, अंबाजोगाई २२, पाटोदा म. ३३, लोखंड सावरगाव २२.८, घाटनांदूर ११.८, बर्दापूर २५.३, केज ३०.५, युसूफवडगाव २६.५, होळ ४६.३, बनसारोळा ४८.८, परळी २९.५, नागापूर २९.५, सिरसाळा १०, पिंपळगाव गाढे १०.५, धारूर ११, मोहखेड १५.३, कौडगाव १६, शिरूर कासार ३०.५, तिंतरवणी ३३.३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Anudan : दूध अनुदानात २ रुपयांची वाढ पण शेतकऱ्यांऐवजी दूध संघांचा फायदा

Crop Damage : तासगाव तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा

Onion Seed : रब्बी कांदा बियाण्याची चढ्या दराने विक्री

Rain Update : सांगली जिल्ह्यात सरासरीच्या १७३.८ टक्के पाऊस

Satara Rain : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT