Crop Damage
Crop DamageAgrowon

Heavy Rain Damage : पुसदमध्ये अतिवृष्टिग्रस्तांना विशेष पॅकेज देण्याची मागणी

Crop Damage : पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या नेतृत्वात अतिवृष्टीग्रस्त गावातील शेतकरी, शेतमजूर, व्यापारी तसेच ग्रामस्थांनी एसडीओ कार्यालयावर धडक दिली.
Published on

Yavatmal News : तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकरी, व्यापारी व नागरिकांना विशेष पॅकेजद्वारा तातडीने मदत करावी, अशी मागणी अतिवृष्टीग्रस्तांनी केली आहे.

पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या नेतृत्वात अतिवृष्टीग्रस्त गावातील शेतकरी, शेतमजूर, व्यापारी तसेच ग्रामस्थांनी एसडीओ कार्यालयावर धडक दिली. यात महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. एसडीओ आशिष बिजवल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Crop Damage
Crop Damage : खानदेशात पावसाने पीकहानी सुरूच

पुसद तालुक्यात ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबरला ढगफुटी सदृश पावसाने हाहाकार माजवला. तालुक्यातील कोपरा, बोरी मच्छींद्र, बोरगडी, बोरी मुखरे, जुना कार्ला, सांडवा, मांडवा, भोजला, चोंढी, बान्शी, वडसद, माणिकडोह, धनसळ, श्रीरामपूर, धनकेश्वर, पार्डी, रोहडा, बेलोरा या व इतर गावांसह पुसद शहरात मोठ्या प्रमाणात शेतकरी, व्यापारी व नागरिकांचे नुकसान झाले.

पुराच्या पाण्यात अनेकांची गुरेढोरे वाहून गेली. अनेक गावांना जोडणारे रस्ते, पूल वाहून गेले. शरद मैंद व त्यांच्या सहकाऱ्यांनी पूरग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या पूरग्रस्तांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीचे आणि पिकांचे नुकसान झाले. त्याची संपूर्ण भरपाई त्वरित देण्यात यावी.

Crop Damage
Crop Damage : नुकसानीच्या साडेतीन लाख पूर्वसूचना

शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा सरसकट विमा देण्यात यावा, पूरग्रस्त भागातील सर्व विद्युत खांब वाहून गेल्याने त्या सर्व गावांना त्वरित वीजपुरवठा सुरळीत करून देण्यात यावा, पूरग्रस्तांची जनावरे या पुरात दगावली, वाहून गेली आहेत, त्यांबाबत भरपाई देण्यात यावी, कोपरा गावातील २४ वर्षीय समाधान पाईकराव यांचे घर वाहून गेल्याने त्याने नैराश्येपोटी आत्महत्या केली.

त्यामुळे शासनाकडून त्याच्या कुटुंबाला मदत करण्यात यावी, अनेक शेतातील सिंचनाच्या विहिरी व गावाला पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पुरामुळे खचल्या आहेत. त्यांना विहीर दुरुस्तीसाठी मदत देण्यात यावी, पूरग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी यंत्रणेला आदेश द्यावेत, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com