Maharashtra Heavy Rain : पुणे, मुंबईसह मराठवाडा आणि विदर्भात पावसामुळे दाणादाण, पिकंही पाण्याखाली

Maharashtra Rain Update : पुणे, मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक जिल्ह्यात पाणीच पाणी झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजीत पुणे दौरा देखील रद्द करण्यात आला आहे.
Rain in Pune Yesterday
Rain in Pune Yesterday Agrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागाच पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. बुधवारी (ता.२५) पुणे, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील बऱ्याच भागांत पावसाने पाणीच पाणी केलं. तर मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पीकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. यामुले शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी सरकारकडे केली आहे.

मोदींचा दौरा रद्द

पुण्यामध्ये बुधवारी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. त्यातच हवामानशास्त्र विभागाने पुणे जिल्ह्याला पावसाचा अलर्ट दिल्याने गुरुवारी (ता.२६) पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. यादरम्यान पावसाचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आणि उद्घाटन कार्यक्रमास बसला आहे. पावसाच्या पार्शभूमिवर मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पाऊस

दरम्यान दोन दिवसांपासून पावसाने पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपून काढलं आहे. कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहर व तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काढणीस आलेली पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सोलापूरच्या बार्शी तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकाला बसला मोठा फटका बसला आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन पीकाचे पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.

Rain in Pune Yesterday
Sindhudurg Rain : सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम

मुंबई शहर आणि उपनगर

मुंबई शहर आणि उपनगरांत देखील पावसाने दाणादाण उडवून दिली असून ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडात दिवसभर पाऊस झाला. यामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली. तर डोंबिवलीत वीज पडून दोघांचा मृत्यू झाला.

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे सेवाही विस्कळीत झाली. दरम्यान गुरुवारी हवामान खात्याने मुंबई महानगराला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच अतिमुसळधार पावसाचा इशारा असल्याने गरज असेल तरच नागरिकांनीही घराबाहेर पडावे, असे आवाहन केले आहे.

मराठवाड्यात सर्वत्र पावसाची हजेरी

मराठवाड्यात देखील पावसाने सर्वत्र हजेरी लावली. बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिवसह जालना, छ. संभाजीनगरच्या विविध भागात तुफान पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यात गेली दोन तीन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे सोयाबीनसह शेती पिकांचे मोठ नुकसान झाले आहे.

यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशीही मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. बीड जिल्ह्यात जोरदार पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन पूर्णतः पाण्यात गेले आहे. यामुळे पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

Rain in Pune Yesterday
Maharashtra Rain : कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील करमाडच्या लाडसावंगी येथे जोरदार पावसामुळे कपाशी आणि मक्का पिकांचं मोठं नुकसान झालं. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावी अशी मागणी आता शेतकरी करत आहे.

पावसाचे पाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयात घुसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. लातूरच्या मुरुड परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान केले.

विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस

नागपूरसह विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. धुळ्यातही सर्वत्र पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. दरम्यान हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्याला पुढील पाच दिवसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

२५ ते २९ सप्टेंबर दरम्यान मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवीला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काढलेली सोयाबीन व इतर पिके झाकून ठेवावी, पावसात झाडा खाली उभे राहू नये, सुरक्षित स्थळी जावे. शेतात जाऊ नये, अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिकला झोडपले

नाशिक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. येवला शहरात मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. अनेक रस्त्यांना नदीचे स्वरुप आले होते. सकल वस्त्यांमध्ये पाणी थेट नागरीकांच्या घरात घुसले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com