government officer caught taking bribe for property registration Agrowon
ॲग्रो विशेष

Government Officer Corruption: मालमत्ता नोंदणीसाठी ४ हजारांची लाच; दुय्यम निबंधक आणि डेटा ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात

ACB Action: मालमत्ता दस्तऐवजाची नोंदणी करून देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी चंद्रपुरातील दुय्यम निबंधक श्रेणी-१ आणि त्यांच्या डेटा ऑपरेटरविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sub Registrar Bribery Case: मालमत्ता दस्तऐवजाची नोंदणी करून देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी चंद्रपुरातील दुय्यम निबंधक श्रेणी-१ आणि त्यांच्या डेटा ऑपरेटरविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपुरातील दुय्यम निबंधक कार्यालयात कार्यरत मोहन चंद्रकांत शेट्टीवार (दुय्यम निबंधक श्रेणी-१) यांनी तक्रारदाराच्या पक्षकारांच्या मालमत्तेच्या दोन दस्तऐवजांची नोंदणी करून देण्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये अशा एकूण चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

ही रक्कम त्यांच्या डेटा ऑपरेटरमार्फत स्वीकारण्यात येणार होती. तक्रारदाराने भद्रावती तालुक्यातील मालमत्तेच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे दुय्यम निबंधक कार्यालयात सादर केली होती. दस्तऐवजांची नोंदणी झाल्यानंतर लाचेची मागणी करण्यात आल्याने तक्रारदाराने लाच देण्यास नकार दिला.

दरम्यान या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष करण्यात आल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. कारवाईदरम्यान आरोपींनी चार हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान आणि अपर पोलिस अधीक्षक माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलिस निरीक्षक सचिन धर्मेजवार तसेच एसीबीच्या सापळा पथकाने केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Irrigation Wells: रखडलेल्या ११० सिंचन विहिरींना पुन्हा जीवदान

MahaDBT Seed Distribution: बियाणे वितरणात लोहा कृषी कार्यालयाची जिल्ह्यात आघाडी

Amit Shah: साखर कारखान्यांसाठी अमित शहांकडून मोठी घोषणा, कोल्हापुरात १,५०० कोटींचा संयंत्र प्रकल्प उभारणार

Malshiras Road Accident: माळशिरस वाहन अपघातप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी समिती गठीत

Stale Seedbed Technique: स्टेल सीडबेड तंत्र- तण नियंत्रणाचा सोपा मार्ग

SCROLL FOR NEXT