Crop Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Disease : पिकांवर बुरशीजन्य रोगाची शक्यता

Unseasonal Rain Update : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. पेंढ्यासह लागवडीखाली असलेल्या पिकांची वाताहत झाली आहे. त्यामुळे महिन्याची मेहनत, पैसा वाया गेला. अशातच जे पीक उभे आहे,

Team Agrowon

Vasai News : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. पेंढ्यासह लागवडीखाली असलेल्या पिकांची वाताहत झाली आहे. त्यामुळे महिन्याची मेहनत, पैसा वाया गेला. अशातच जे पीक उभे आहे,

त्यांच्यावरही पावसामुळे बुरशीजन्य रोगाची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चितेंत भर पडत आहे. मोठी हानी टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना करावी, अशा सूचना कृषी विभागाकडून करण्यात आल्या.

पालघर जिल्ह्यात विविध भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली आहे. शेकडो हेक्टरवर हे पीक घेण्यात आले आहे. मुंबई, ठाणे यासह आजूबाजूच्या जिल्ह्यात पालघर जिल्ह्यातील भाजीला मागणी असते. त्यामुळे अर्थार्जनाचा मार्ग शेतकऱ्यांना मिळतो. लागवडीसाठी महिनाभर शेतकरी काबाडकष्ट करतात.

मजुरांची वाढती मजुरी, बी-बियाण्यांची किंमत, तसेच देखभाल आदी खर्च केला जातो. यंदा अचानक पावसाने भातपीक, पेंढा, तसेच भाजीपाला लागवडीवर परिणाम झाला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिकांची हानी झाल्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार. त्यातच ज्या पिकांचे नुकसान झाले नाही, अशा पिकांना भुरी रोग (पांढरी बुरशी), करपा रोगाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शेतकरी हवालदिल

शेतकरी वर्गाला काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. बदलत्या हवामानाच्या सावटाखाली शेतकरी मेहनतीने पीक घेत असतात, मात्र अशा वातावरणामुळे बुरशीजन्य रोगांची लागण होऊन उत्पादन घटते. त्यामुळे शेतकरी हवालदिल होत आहेत.

पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाने कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी येणाऱ्या कीड रोगावर वेळीच उपाययोजना कराव्यात. लागवडीखाली असणाऱ्या पिकावर कीटकनाशक फवारावे.
डॉ. एल. के. गबाले, पालघर कृषी संशोधन केंद्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : सातारा जिल्ह्यात १ लाख शेतकऱ्यांना पीकविम्याचा आधार

Delhi Farmers Meeting : ‘दिल्ली’ने ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Rabi Crop Seminar : संकटाच्या स्थितीत कृषी विभाग, कृषी विद्यापीठ सदैव शेतकऱ्यांसोबत; रब्बी पीक परिसंवादात तज्ज्ञांचा दिलासा

Chimur Farmers Protest : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी चिमूरमध्ये आक्रोश मोर्चा

Sangli Bank Election : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

SCROLL FOR NEXT