Crop Damage : पावसामुळे तूर, ज्वारी, पपई, केळी पिके झाली आडवी

Unseasonal Rain Crop Loss : पहिल्या दिवशी विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे तूर, ज्वारी, पपई, केळी, ऊस, आदी पिके जमिनीवर आडवी झाल्याने मोठे नुकसान झाले.
Crop Damage
Crop Damage Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : लोहगाव महसूल मंडलात सलग दुसऱ्या दिवशीही रात्री मॉन्सुनोत्तर पावसाने हजेरी लावली. पहिल्या दिवशी विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे तूर, ज्वारी, पपई, केळी, ऊस, आदी पिके जमिनीवर आडवी झाल्याने मोठे नुकसान झाले. नुकसान झालेले शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहेत.

लोहगाव भागात रविवार (ता. २६) रात्री साडेदहा ते पहाटेपर्यंत विजांच्या कडकडाटात मेघगर्जनेसह जोरदार वादळी वाऱ्याने ज्वारी, तूर, ऊस, पपई, केळी आदी पीक आडवे होऊन तोंडचा घास हिरावल्याने शेतकरी हताश झाले आहेत.

Crop Damage
Crop Damage : पावसाने २० हजार एकर द्राक्ष बागांचे नुकसान

खरीप हंगामात पावसाअभावी पीक हातातून गेल्यानंतर थोडाबहुत शिल्लक राहिलेल्या कापसाच्या आता वाती झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. रविवार व सोमवार दोन रात्री पडलेल्या पाऊस वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांचे कांदा रोप, गहू, इतर पिकांत पाणी साचल्याने नुकसान झाले.

Crop Damage
Crop Damage : चार लाख हेक्टरहून अधिकपिकांना पावसाचा फटका

मुलानीवाडगाव येथील ज्ञानेश्‍वर चंदभान उघडे या शेतकऱ्यांचे एक एकर पपई, दोन एकर केळी, तूर, ऊस, पीक वादळी वारा पाऊसाने जमिनीवर अडवे होऊन नुकसान झाले. या बाबत ज्ञानेश्‍वर उघडे यांनी स्थानिक तलाठ्यांना फोनवर संपर्क केला.

असता अद्याप आम्हाला महसूल कार्यालयाकडून पंचनामे करण्याचे आदेश आला नाही, असे सांगण्यात आले. नुकसान झालेल्या सर्व पीक, फळबागांचे, पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com