Fungal Diseases In Grape Crop : बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर

National Grape Research Center : रोगनियंत्रणासाठी मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने द्राक्षासाठी जैविक बुरशीनाशक मांजरी ट्रायकोशक्ती (भुकटी) आणि मांजरी वाइनगार्ड (द्रवरूप) विकसित केले आहे.
Incidence of fungal diseases
Incidence of fungal diseasesAgrowon

डॉ. सुजॉय साहा, ऋषिकेश भोसले

Grape Update : सध्या राज्यातील सर्वच द्राक्ष पट्ट्यात पाऊस सुरू आहे. या काळात बागेत रोगांचा प्रादुर्भाव होण्यास अनुकूल हवामान स्थिती असते. पावसाळी वातावरणामुळे बागेतील जमिनीमध्ये ओलावा असतो. त्यामुळे वेलींच्या मुळांभोवती सुप्तावस्थेत असलेले रोगांचे बीजाणू सक्रिय होऊन ते द्राक्ष वेलीस प्रभावित करतात.

रोग व्यवस्थापनाकरिता रासायनिक निविष्ठांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे जमिनीचा पोत खालावत जातो. यावेळी रासायनिक निविष्ठांऐवजी जैविक बुरशीनाशकांचा वापर फायदेशीर ठरतो.

रोगनियंत्रणासाठी मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने द्राक्षासाठी जैविक बुरशीनाशक मांजरी ट्रायकोशक्ती (भुकटी) आणि मांजरी वाइनगार्ड (द्रवरूप) विकसित केले आहे. ट्रायकोडर्मा ही रोगकारक बुरशींच्या धाग्यांना विळखा घालून त्यातील पोषक द्रव्य शोषून घेते.

परिणामी, रोगकारक बुरशीमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होऊन त्यांची वाढ खुंटते. ट्रायकोडर्मा हा नैसर्गिक घटक असून, पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होत नाही.

Incidence of fungal diseases
New Grape Varieties : निर्यातक्षम उत्पादनासाठी नवे द्राक्ष वाण आयात करा

खरड छाटणी झाल्यानंतर ट्रायकोडर्माचा वापर केल्यास बागा एकसारख्या फुटण्यास मदत होते. तसेच ड्रेंचिंग केल्यास मुळीच्या सभोवताली असलेल्या रोगकारक बीजाणूला नष्ट करते. त्यामुळे वेलीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढून वेली सक्षम होतात. याशिवाय ट्रायकोडर्मा बुरशीची वेलीवर वाढ होऊन ती रोगकारक बुरशीची वाढ होण्यापासून अटकाव करते.

वापर

- मांजरी ट्रायकोशक्ती (भुकटी) १० ग्रॅम प्रति एकर प्रमाणे ठिबकद्वारे द्यावे.

- मांजरी वाइनगार्ड (द्रवरूप) २ ते ५ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी किंवा ठिबकद्वारे २ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी.

घ्यावयाची काळजी

- ट्रायकोडर्मा व रासायनिक बुरशीनाशके यांचा एकत्रित वापर (टॅंक मिक्स) करू नये.

- ट्रायकोडर्मा सूर्यप्रकाशापासून दूर थंड जागेत साठवावे.

- कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत. फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे.

- खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे. बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे. लेबल क्लेम वाचावेत. पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत. रसायनांचा गट तपासावा. पीएचआय, एमआरएल तपासावेत. पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.

संपर्क - डॉ. सुजॉय साहा, ९४५०३९४०५३, ऋषिकेश भोसले, ९६५७१४५५३३, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि.पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com