Agriculture Fertilizers Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Fertilizers : खानदेशात संयुक्त खतांची मागणी अधिक; पुरवठा संथ

Fertilizers Demands Update : खानदेशात डीएपी, १०.२६.२६ ची टंचाई कायम आहे. यातच फळ पिकांची लागवड सुरूच आहे. त्यासाठी भेसळ डोससंबंधी संयुक्त खतांची मागणी अधिक आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात डीएपी, १०.२६.२६ ची टंचाई कायम आहे. यातच फळ पिकांची लागवड सुरूच आहे. त्यासाठी भेसळ डोससंबंधी संयुक्त खतांची मागणी अधिक आहे. यंदा जलसाठे मुबलक असल्याने फळबागायती वाढली असून, खतांची मागणीही अधिक आहे.

सुपर फॉस्फेट वगळता अन्य खतांचा पुरवठा कमी आहे. त्यात संयुक्त खतांची मागणी केळी व भाजीपाला पट्ट्यात अधिक आहे. पण खतपुरवठा संथ गतीने या हंगामात सुरू आहे. अशीच स्थिती राहिल्यास मोठी टंचाई तयार होईल, अशी स्थिती आहे.

डीएपी व १०.२६.२६ या खताचा पुरवठा कमी आहे. या खतांची मागणी सर्वाधिक असते. परंतु पुरवठा कमी असते. या खताची जळगाव जिल्ह्यात खरिपात २२ ते २६ हजार टन मागणी असते. परंतु पुरवठा १८ आहे. यामुळे टंचाई अधिक आहे. शेतकरी डीएपी, १०.२६.२६ ची मागणी करतात. केळी, भाजीपाला पट्ट्यात या खताचा उठाव अधिक आहे. याच भागात टंचाई आहे. या खताचा रब्बीतील पुरवठाही विस्कळित आहे.

युरियाची मागणीदेखील १०.२६.२६ सारखीच आहे. अनेक शेतकरी एकाच वेळी युरियाची खरेदी करीत आहेत. यामुळे मागणी अधिक आणि खतांचा तुटवडा, अशी स्थिती आहे. प्रत्येक भागात समान वितरण व एकाच शेतकऱ्यास अधिकचे खत देणे टाळले पाहिजे, असाही मुद्दा उपस्थित होत आहे.

रब्बी दीड लाख टन विविध खते जिल्ह्यात येतील. त्याचा पुरवठा लक्ष्यांक वरिष्ठ कार्यालयाने मंजूर केला आहे. परंतु या लक्ष्यांकानुसार पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे. यामुळे कृषी विभागासमोर हा पुरवठा करून घेण्याचे आव्हान आहे. कारण खत पुरवठा विविध खतकंपन्या करतात. त्यात कमाल कंपन्या शासनाच्या किंवा केंद्र सरकार पुरस्कृत आहेत.

या कंपन्यांकडून सुरळीत खतपुरवठा होत नाही. जळगाव जिल्हा खतवापरात सर्वात पुढे आहे. कडधान्ये, तृणधान्य, तेलबिया व अन्य कोरडवाहू पिकांची पेरणी झाली आहे. रब्बीची पेरणी ११० टक्क्यांवर आहे. अनेक शेतकरी पेरणी करतानाच खतेही देतात. या काळात खतांची मागणी आहे. पण शेतकरी खतांसाठी दोन महिन्यांपासून वणवण फिरत आहेत.

कृषी विभागाने खतपुरवठ्याबाबत योग्य ते नियोजन करावे व गतीने कार्यवाही करावी. खतपुरवठादारांशी पत्रव्यवहार करावा, अशी मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT