Rabbi Sowing : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत रब्बी पिकांची १९ हजार हेक्टरवर पेरणी

Rabbi Season : अनेक भागांत वाफसा नसल्यामुळे पेरणी लांबणीवर
Rabbi Season
Rabbi Season Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी ः यंदाच्या (२०२४) रब्बी हंगामात शुक्रवारपर्यंत (ता. २५) परभणी व हिंगोली जिल्ह्यांत १९ हजार २९५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. कृषी विभागाकडील माहितीवरून हे स्पष्ट होत आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसानंतर रखडलेल्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. परंतु अनेक भागांत वाफसा नसल्यामुळे तसेच सोयाबीन काढणीनंतर जमीन तयार नसल्यामुळे पेरणी लांबणीवर पडली आहे.

Rabbi Season
Summer Sowing : तीन जिल्ह्यांत १९ हजार ८६७ हेक्टरवर उन्हाळी पेरणी

परभणी जिल्ह्यात रब्बीचे सरासरी २ लाख ७० हजार ७९४ हेक्टर असून शुक्रवारपर्यंत (ता. २५) जिल्ह्यात १३ हजार ८६५ हेक्टरवर (५.१ टक्के ) पेरणी झाली आहे. आजवरच्या पेरणीमध्ये ज्वारीची १ लाख १३ गजार ८९ पैकी ८ हजार ५६ हेक्टर (७.१२ टक्के), गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी १५२ हेक्टर (०.३९ टक्के), मक्याची २ हजार ८६ पैकी ५.५ हेक्टर (०.२६ टक्के) पेरणी झाली. हरभऱ्याची १ लाख १२ हजार १७० पैकी ५ हजार ५६४ हेक्टर (४.९६ टक्के), करडईची ३ हजार ३७१ पैकी ८७ हेक्टर (२.५८ टक्के) पेरणी झाली आहे.

परभणी, जिंतूर तालुक्यात पेरणी झाली आहे. परंतु त्याबाबतची आकडेवारी कृषी विभागाकडे प्राप्त नसल्याचे सूत्रांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ७६ हजार ८९१ हेक्टर असून शुक्रवारपर्यंत (ता. २५) ५ हजार ४३० हेक्टरवर (३.१ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची ११ हजार ६९७ पैकी ३५८ हेक्टर (३.०६ टक्के), गव्हाची ४२ हजार ५०५ पैकी १६२ हेक्टर (०.३८ टक्के), मक्याची ९७१ पैकी ४८ हेक्टर (४.९४ टक्के) पेरणी झाली. हरभऱ्याची १ लाख २० हजार १४७ पैकी ४ हजार ८१९ हेक्टर (४.०१ टक्के), करडईची २०५ पैकी ४३ हेक्टर (२०.९१ टक्के) पेरणी झाली. वसमत तालुक्यातील पेरणीची माहिती अप्राप्त असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com