Junnar News: सततचा पाऊस, अतिवृष्टी, ऊन्हाची कमतरता आदी कारणांनी जुन्नर तालुक्यातील द्राक्षशेतीला मोठा फटका बसला आहे. परिणामी निर्यातक्षम जम्बो द्राक्ष उत्पादनात राज्यात अग्रेसर असलेल्या येथील द्राक्ष शेतीला घरघर लागली आहे. यामुळे लाखो रुपये खर्च करून जीवापाड जपलेल्या द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. .सलग दुसऱ्या वर्षी छाटणीनंतर घडनिर्मिती न झाल्याने मागील महिनाभरात तालुक्यातील सुमारे ४०० एकर द्राक्षबागा शेतकऱ्यांनी तोडून भुईसपाट केल्या आहेत. द्राक्षबागा तोडण्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. यामुळे यावर्षी द्राक्ष निर्यातीत मोठी घट होणार असून याचा फटका तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना बसणार आहे..Banana Crop Loss: दोन एकरांतील केळी पीक कापून टाकले.जुन्नर तालुक्यात गुंजाळवाडी, नारायणगाव, वारूळवाडी, येडगाव, मांजरवाडी, राजुरी, गोळेगाव या भागात सुमारे साडेतीन हजार एकर क्षेत्रात जम्बो, किंगबेरी, रेड ग्लोब, तास ए गणेश, थॉमसन सीडलेस, क्रिमसन आदी निर्यातक्षम जातीच्या द्राक्षबागा आहेत. द्राक्ष निर्यातीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याने मागील काही वर्षांत कृषी, अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले तरुण शेतकरी द्राक्षशेतीकडे वळले आहेत..बाग उभारणी, ठिबक सिंचन, मशागत व फवारणीसाठी ट्रॅक्टर, ब्लोअर खरेदी आदींसाठी शेतकऱ्यांनी एकरी ८ ते ९ लाख रुपयांचा भांडवली खर्च केला आहे. काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शासनाच्या अनुदान योजनांचा लाभ घेऊन शीतगृहांची उभारणी केली आहे.Grape Grower: हवामान बदलाने द्राक्षांवर संक्रांत.द्राक्ष बागांचा वाढलेला भांडवली खर्च, मागील तीन ते चार वर्षांत झालेला हवामान बदल, खते, औषधे, मजुरी आदींचा वाढलेला भांडवली खर्च, गारपीट, अतिवृष्टीचे सततचे अस्मानी संकट यामुळे अपेक्षित निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेता आले नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील कर्जाचा बोजा वाढत चालला आहे..बहुतेक शेतकऱ्यांनी घड निर्मिती न झालेल्या द्राक्षबागा या वर्षी तोडण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यात द्राक्षबागेखालील सर्वाधिक ७०० एकर क्षेत्र गुंजाळवाडी परिसरात आहे. यापैकी मागील महिनाभरात १०० एकर क्षेत्रातील द्राक्षबागा तोडल्या गेले आहेत..नारायणगाव, वारूळवाडी, हिवरे तर्फे नारायणगाव, मांजरवाडी, येडगाव, राजुरी परिसरातील सुमारे १५० एकर, गोळेगाव भागातील ४० एकर द्राक्ष बागा मागील महिनाभरात तोडल्या गेल्या आहेत.प्रकाश वाघ, तुकाराम ताम्हाणे,श्रीकांत वायकर, संतोष शिंदे, राहुल वायकर ,सचिन ढवळे, गिरीश ढवळे, विलास वायकर, निखिल वायकर, आशिष तोडकर, धनंजय ढवळे, राजेश ढवळे, रोहन पाटे, विलास पाटे, नामदेव तोडकरी, जितेंद्र भोर या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जम्बो द्राक्ष बागा तोडल्या आहेत..मे महिन्यात ३४० मिलीमीटर पाऊस झाला. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका द्राक्ष पिकाला बसला आहे. देशाला परकीय चलन मिळवून देणारा द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. कर्जबाजारी झालेला द्राक्ष उत्पादक पुन्हा उभा करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने तातडीने द्राक्ष उत्पादकांसाठी विशेष मदत जाहीर करावी.राहुल बनकर, द्राक्ष बागायतदार..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.