Agriculture Fertilizers : नांदेडला संरक्षित साठ्यातील युरिया, डीएपी खते केली खुली

Fertilizers Update : जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना लागणारा डीएपी तसेच युरिया ३११९ टन खताचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) खुला केला आहे.
Fertilizers
Fertilizers Agrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना लागणारा डीएपी तसेच युरिया ३११९ टन खताचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) खुला केला आहे. जिल्ह्यातील सोळा तालुक्यांना एमएआयडीसीकडील ६१९ टन डीएपी व डीएमओकडील २५०० टन युरीयाचे वितरण करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

सध्या जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. शेतकरी खताचा दूसरा हप्ता देण्यासाठी युरिया तसेच डीएपीची मागणी करत आहेत. परंतु अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना युरिया तसेच डीएपी खत मिळत नसल्याचे दिसून येत होते. कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर डीएपी व युरिया उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना माघारी फिरावे लागत आहे. सध्या शेतकरी सोयाबीनला खताच्या दुसऱ्या हप्त्यात युरिया खत देतात.

Fertilizers
Kharif Fertilizers Management : खरीप हंगामातील पिकांना द्या संतुलित खते

तर कपाशीलाही खताच्या दुसऱ्या हप्त्यात युरिया तसेच डीएपी खत देतात. तसेच हळद, केळी, ऊस या पिकांनाही युरिया तसेच डीएपीची आवश्यकता अधिक असते. परंतु या महत्त्वाच्या काळातचा शेतकऱ्यांना खत मिळत नव्हता. यामुळे शेतकरी तालुका तसेच जिल्हास्तरावर शासकीय कार्यालय गाठून युरिया व डीएपी खत उपलब्ध करुन देण्याची मागणी करत होते. यासोबतच राजकीय पदाधिकारी तसेच काही संघटनांनीही शेतकऱ्यांना युरिया व डीएपी खत उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती.

Fertilizers
Fertilizers Supply : राज्यात बनावट संयुक्त खतांचा पुरवठा

यामुळे जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडील ६१९ टन डीएपी, तर जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाकडील २५०० टन युरिया असा एकूण ३११९ टन खत जिल्ह्यात वितरित करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार कृषी विभागाने तालुकानिहाय मागणीनुसार विवरण तयार करून युरिया व डीएपी खत खुला केला आहे. हा खत शेतकऱ्यांना लवकर उपलब्ध व्हावा, यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे.

तालुकानिहाय युरिया व डीएपी खताचे वितरण (वितरण टनांत)

तालुका युरिया डीएपी

धर्माबाद २०० १००

नायगाव १५० ५०

देगलूर १९६ ५०

मुदखेड १०० २०

किनवट २२० ५५

भोकर १५० २५

उमरी २०० २०

हदगाव २०० ४०

कंधार १५० ५९

लोहा २०४ १००

मुखेड २०० १००

बिलोली १०० ३०

अर्धापूर १०० २०

नांदेड १५० २०

माहूर १५० २०

हिमायतनगर १५० २०

एकूण २५०० ६१९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com