Cotton Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Procurement : कापूस उत्पादकांच्या नोंदणीत अडचणी नकोत

Cotton Rate :कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नोंदणीमध्ये नाहक अडचणी आणू नका, अशी सूचनाही त्यांनी केली.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यात ‘सीसीआय’च्या कापूस खरेदीसाठी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील मौजे केळीवेळी (ता. अकोट) येथील ग्रामदानी शेतकऱ्यांच्या ७/१२ वरील रकाना ७ मध्ये ग्राम मंडळ नमूद असल्यामुळे सीसीआयकडून कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करून घेण्यात येत नाहीत.

अशा तक्रारी शेतकऱ्यांकडून आल्यानंतर दखल घेत आमदार रणधीर सावरकर यांनी सीसीआयच्या अधिकाऱ्यांना नोंदणीचे निर्देश दिले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नोंदणीमध्ये नाहक अडचणी आणू नका, अशी सूचनाही त्यांनी केली.

५ ते १५ नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यात चोहोट्टा बाजार, चिखलगाव, मूर्तिजापूर, तेल्हारा, पारस, हिवरखेड, बोरगाव मंजू, बार्शीटाकळी व अकोट अशा केंद्रांवर सीसीआयमार्फत कापूस खरेदी सुरू करण्यात आलेली आहे. मात्र केळीवेळी येथील शेतकऱ्यांच्या सात-बारामधील रकाना ७ मध्ये ग्राम मंडळ नमूद असल्यामुळे सीसीआयकडून कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करून घेण्यात येत नाही.

अशा तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात होत्या. राज्यात अनेक गावे या कायद्याअंतर्गत नोंदलेली आहेत. त्यामुळे ग्रामदानी कायद्याअंतर्गत गावातील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अशा अन्यायाबाबत आपल्या विभागाला जबाबदारी टाळता येणार नाही, याची नोंद घ्यावी असे सांगितले आहे.

केळीवेळी गाव ग्रामदान अधिनियम १९६४ अंतर्गत येत असल्याने ७/१२ जरी ग्राम मंडळाची नोंद असली तरी प्रत्यक्षात कब्जेदार असलेला वैयक्तिक शेतकरी हा जमीन कसदार असून तो शेतीचा वहिवाटदार आहे.

त्यामुळे या शेतकऱ्यांचे कपाशी उत्पादन सीसीआयअंतर्गत विक्री करण्याचा या शेतकऱ्यांना अधिकार आहे. त्यानुसार सीसीआयकडून अशा शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी नोंदणी करून घेणे आवश्यक आहे, असे आमदार सावरकर यांनी कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT