Cotton Production : खारपाणपट्ट्यात कपाशीची लवकर उलंगवाडी

Cotton Picking : कपाशीचे उभे पीक सुकू लागले आहे. वास्तविक हिवाळ्यात खारपाण पट्ट्यातील पिके हे बहरावर राहतात. त्यातही कपाशीचे पीक अधिक जोमाने वाढीवर, फळधारणेवर असते.
Cotton
CottonAgrowon
Published on
Updated on

Akola News : जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यात काही भागात कपाशीचे पीक आता हिवाळ्यातच उलंगवाडीवर आले आहे. यंदा उत्पादनात मोठी घट येईल, हे स्पष्ट झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

खारपाण पट्ट्यातील मुंडगाव, वणीवारुळा, लामकानी, खेर्डा, सोनबर्डी, तांदूळवाडी, बळेगाव, सुलतानपूर, आलेगाव, पिंपरी डिक्कर, देवरी, आलेवाडी, कावसा कुटासा, तरोडा, मरोडा, वरूर जऊळका, दिनोडा या गावांसह इतर गावांमध्ये कपाशी पिकावर लाल्या, करप्याचा प्रादुर्भाव झाला आहे. कपाशीचे उभे पीक सुकू लागले आहे.

Cotton
Cotton Picking : कापूस वेचणीला आला; सीतादहीची लगबग

वास्तविक हिवाळ्यात खारपाण पट्ट्यातील पिके हे बहरावर राहतात. त्यातही कपाशीचे पीक अधिक जोमाने वाढीवर, फळधारणेवर असते. यावर्षी हिवाळ्यातच कपाशीची उलंगवाडी होण्याची शक्यता तयार झाली आहे. या भागातील शेतकऱ्यांना आतापर्यंत कापसाचे एकरी ५० ते ६० किलोदरम्यान उत्पादन आलेले आहे.

दरवर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी उत्पादन आलेले आहे. यावर्षी कपाशीची लागवड केल्यापासून शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागलेला आहे. जास्त पावसाने शेतकरी आधिच चिंतातूर होता. आता पीक सुधारण्याचा काळ सुरू झाला असताना पीक लाल्या, करप्याच्या विळख्यात सापडले.

Cotton
Cotton Picking : कपाशीचा दोन वेचणीतच झाला खराटा

यावर्षी कपाशी पिकावर लाल्या, करपा, अमेरिकन अळी, बोंडअळी आल्याने नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी सोनबर्डी येथील शेतकरी किशोर आवारे, बबन वडतकार यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केली आहे.

माझ्या शेतातील तीन एकरांतील कपाशीचे पीक पूर्णतः सुकले आहे. तीन एकरांमध्ये आतापर्यंत दीड क्विंटल कापूस आला आहे. आता पीक सुकल्यामुळे किती कापूस होईल हे सांगता येत नाही.
- अनंत पालखडे, शेतकरी, वणीवारूळा
खारपाणपट्ट्यातील कपाशीचे पीक वाळत चालल्याने हिवाळ्यातच उलंगवाडी होत आहे. शेतकरी आर्थिक संकटात आला आहे.
- श्याम खोकले, शेतकरी, मुंडगाव, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com