Fodder camp Agrowon
ॲग्रो विशेष

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Fodder Shortage : घनसावंगी तालुक्‍यात यंदा गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेला चारा संपत आल्याने चाराटंचाईने शेतकरी व पशुपालक त्रस्त झाले आहेत.

Team Agrowon

Jalna News : घनसावंगी तालुक्‍यात यंदा गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेला चारा संपत आल्याने चाराटंचाईने शेतकरी व पशुपालक त्रस्त झाले आहेत. या उन्हाळ्यात दुष्काळजन्य स्थिती, पशुखाद्याचे व चाऱ्याचे वाढलेले भाव आदी कारणांमुळे अनेक शेतकरी गुरांची विक्री करीत आहेत.

मेढपाळांनाही दुष्काळाच्या झळा बसत आहेत. शासनाने लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. यंदा अत्यल्प पावसामुळे चारा व पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मध्यतंरी उसाची तोड असल्याने शेतकऱ्यांना जनावरांना उसाच्या चाऱ्याचा उपयोग झाला.

त्यानंतर ज्वारीचा कडबा कमीत कमी २ हजार ६०० रुपये तर जास्तीत जास्त २ हजार ८०० रुपये शेकडा या दराने विकला जात आहे. तर काहींनी तीन हजार रुपये दराचा भाव मिळेल या आशेने कडबा विकलेला नाही. चारा टंचाईमुळे अनेकजण जनावरे विकत आहेत.

चारा टंचाईबरोबरच पाणीटंचाईचा फटकाही जनावरांना बसत आहे. कारण या परिसरातील सर्वच सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहेत. विहिरी, बोअरची पाणीपातळी खालावली आहे.

त्यामुळे जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी कुठे घेऊन जावे अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने याची दखल घेत जनावरांसाठी चारा छावण्या उभाराव्यात अशी मागणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT