Insect Infestation Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Crop Advisory : काजू पीक सल्ला

Insect Infestation : फुलोरा ते फळधारणा अवस्थेतील काजूवर मावा आणि ढेकण्या (टी मॉस्किटो बग) किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो.

Team Agrowon

फुलोरा ते फळधारणा अवस्था

फुलोरा ते फळधारणा अवस्थेतील काजूवर मावा आणि ढेकण्या (टी मॉस्किटो बग) किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. ही कीड मोहरातील/फळातील रस शोषून घेते. यांच्या प्रौढ आणि पिलाची लाळ फायटोटॉक्सिक असल्याने पालवी/मोहर सुकून जातो.

मोहराच्या दांड्यावर काळे डाग दिसून येतात. फळांची गळ दिसून येते. मावा कीटक अंगातून मधासारखा गोड पदार्थ बाहेर टाकतात. त्यावर मुंग्या आकर्षित होताना दिसून येतात. या किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी (प्रमाण प्रति लिटर पाणी)

अ) मोहर फुटण्याच्यावेळी प्रोफेनोफॉस*

(५० टक्के प्रवाही) १ मि.लि. आणि

ब) फळधारणेच्या वेळी, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन* (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. किंवा ॲसिटामिप्रीड* (२० टक्के एसपी) ०.५ ग्रॅम. फवारणी पानांच्या खालून आणि वरून व्यवस्थित बसेल अशी करावी. फवारणी शक्यतो सकाळी १० पूर्वी किंवा संध्याकाळी ४ नंतर करावी.

(टीप* : लेबल क्लेम नाही, ॲग्रेस्को शिफारस आहे.) एकाच कीटकनाशकाची सलग फवारणी घेणे टाळावे.

काजू पिकाची फळधारणा व उत्पन्न वाढविण्यासाठी स्वस्त अशा सुकविलेल्या माशांचा अर्क ५०० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फुले येताना पहिली फवारणी व पहिल्या फवारणीनंतर १० दिवसांनी दुसरी फवारणी करावी, अशी ॲग्रेस्को शिफारस आहे.

फळधारणा अवस्थेतील काजूवर बोंड आणि बी पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव दिसून येते. किडीची अळी बी व बोंडावरील भाग खरवडून त्याच्यावर आपली उपजीविका करते. त्यानंतर अळी बी व बोंडामध्ये प्रवेश करून आपला प्रवेश मार्ग विष्टेच्या सहाय्याने बंद करते. या अळीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस १.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

फळधारणा झालेल्या काजू झाडांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना पहिली २ ते ३ वर्षे ८ दिवसांच्या अंतराने १५ लिटर पाणी प्रति कलम देण्याची व्यवस्था करावी. झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.

काजू झाडावर खोडकिडीचा प्रादुर्भाव खोड आणि उघडी मुळे यावर दिसून येण्याची शक्यता असते. यासाठी किडीच्या प्रादुर्भावाकडे खोडाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. खोडकिडीची अळी झाडाची साल पोखरून आतील गाभा खाते. खोडाला पडलेल्या छिद्रातून भुस्सा बाहेर पडलेला दिसतो. खोडातून भुस्सा येताना दिसल्यास त्वरित नियंत्रणाचे उपाय करावे. प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी खोडाची प्रादुर्भावित साल काढून तारेच्या हुकाने किडीला बाहेर काढून मारुन टाकावे.

क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या द्रावणाने साल काढलेला भाग चांगला भिजवावा किंवा क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) १० मि. ली. द्रावण छिद्रामध्ये ओतावे. झाडाला कोणत्याही प्रकारे इजा करू नये.

इजा झाल्यास त्याला बोर्डो पेस्ट लावून जखम झाकावी. झाडाची मुळे उघडी राहणार नाही, याची नेहमी काळजी घ्यावी. नियमित बागेची गवत काढून साफसफाई करावी. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.

- डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१

(ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT