Paddy Pest : भातपिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव

Paddy Pest Control : कृषी विभागाकडून तळा तालुक्यामध्ये क्रॉप सॅप योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत भातपिकांच्या कीडरोगांची निरीक्षणे वेळोवेळी मोबाईल ॲपच्या माध्यमातून घेतली जात आहे.
Paddy Pest
Paddy PestAgrowon
Published on
Updated on

Paddy Crop Management : कृषी विभागाकडून तळा तालुक्यामध्ये क्रॉप सॅप योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत भातपिकांच्या कीडरोगांची निरीक्षणे वेळोवेळी मोबाईल ॲपच्या माध्यमातून घेतली जात आहे. या अंतर्गत निरीक्षणावेळी तालुक्यातील रोवळा व वरळ या भागांमध्ये भातपिकांवर पिवळ्या खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले.

Paddy Pest
Paddy Crop : भातपिकांवर करप्याचा प्रादुर्भाव

खोडकिडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. सध्या खोड कीड नियंत्रणात असून प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.

खोड किडीविषयी मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी माहिती देताना सांगितले, खोड कीड ही भातपिकावरील एक मुख्य कीड आहे. तिचे वेळीच नियंत्रण केले पाहिजे. सध्या तालुक्यात उष्ण व दमट हवामान असल्याने काही गावांमध्ये किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.

Paddy Pest
Paddy Production : रत्नागिरी जिल्ह्यातील भाताचे उत्पादन ५ टक्क्यांनी घटणार

प्रादुर्भाव कसा होतो?

किडीची अळी सुरुवातीस काही वेळ कोवळ्या पानांवर आपली उपजीविका करते. नंतर ती खाली येऊन खोडास छिद्र पाडून आत प्रवेश करते. आतील भाग पोखरून खाते. किडीचा प्रादुर्भाव जर पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजेच फुटवे येण्याच्या वेळी किंवा पीक पोटरीवर येण्यापूर्वी झाला, तर रोपाचा मधला पोंगा लालसर पिवळा पडून वरून खाली सुकत येतो. यालाच ‘गाभामर’ असे म्हणतात.

सुकलेला किंवा मेलेला पोंगा हाताने ओढला असता सहजासहजी निघून येतो. पोटरीतील पिकावरही खोडकिडीचा उपद्रव आढळून येतो. त्यामुळे दाणे न भरलेल्या पांढऱ्या लोंब्रा बाहेर पडतात. यालाच पळींज किंवा पांढरी पिशी असे म्हणतात. परिणामत: भाताच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होते.

किडीवर नियंत्रण

पिकाची वरचेवर पाहणी करून कीडग्रस्त फुटवे काढून नष्ट करावेत. हे काम हंगामातून तीन ते चार वेळा करावे. शेतात पक्षीथांबे लावावेत. जर शेतामध्ये पाच टक्के कीडग्रस्त फुटवे दिसल्यास फवारणीसाठी क्विनॉलफॉस ३.२ मिली या कीटकनाशकाची प्रतिलिटर पाण्यामध्ये फवारणी करावी. अधिक माहितीसाठी कृषी सहायक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करा, असे आवाहन सचिन जाधव यांनी केले आहे.

रोवळा व वरळ या गावांमधील भात शेतांमध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला आहे. किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या खाली आहे. प्रादुर्भाव वाढल्यास कृषी विभागाकडून ५० टक्के अनुदानावर औषधे उपलब्ध करून देण्यात येतील.
- सचिन जाधव, मंडळ कृषी अधिकारी, तळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com