Maharashtra Agriculture : परभणी जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील डिजिटल क्रॉप सर्वे ॲपद्वारे (ई-पीक) पीकपेरा नोंदणीचे काम संथ गतीने सुरू आहे. सोमवार (ता. ७) पर्यंत २ लाख ६० हजार ७०२ शेतकरी खातेदारांच्या (प्लॉट) पीकपेरा नोंदी झाल्या असून, एकूण ३९.४३ टक्के काम पूर्ण झाले आहे..परभणी जिल्ह्यात एकूण शेतकरी खातेदारांची संख्या (प्लॉट) ७ लाख ६४ हजार ७१६ आहे. त्यापैकी डिजिटल क्रॉप सर्वे ॲपद्वारे पीकपाहणीसाठी ६ लाख ८९ हजार ४४२ प्लॉट निश्चित करण्यात आले आहेत. .E Pik Pahani: ई-पीकपाहणीचा टक्का अमरावतीत वाढेना .सोमवार (ता. ७) पर्यंत २ लाख ६० हजार ७०२ शेतकरी खातेदारांच्या पीकपेरा नोंदी करण्यात आल्या. त्यापैकी ३१ हजार ९०४ शेतकऱ्यांच्या पीकपेरा नोंदींना मंजुरी देण्यात आली असून, २ लाख २५ हजार ६३५ प्लॉटची मंजुरी प्रलंबित आहे. तर ३ हजार १६३ नोंदी नाकारण्यात आल्या आहेत..E Pik Pahani: अमरावती जिल्ह्यातील ई-पीक पाहणीचा टक्का वाढेना.डिजिटल क्रॉप सर्वे ॲपद्वारे प्रत्येक गावातील शेतकऱ्यांची गटनिहाय व सर्वे क्रमांकनिहाय प्रत्यक्ष पिकांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करून क्रॉप रजिस्ट्री (पीक नोंदवही) अद्ययावत करण्यात येणार आहे. या माहितीचा उपयोग विविध कृषी योजना, पीकविमा, नैसर्गिक आपत्तीतील मदत, कृषी सांख्यिकी तसेच अॅग्रीस्टॅकअंतर्गत करण्यात येणार आहे..१० नोव्हेंबरपर्यंत पीकपेरा नोंदणीचे काम १०० टक्के पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. याअंतर्गत संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत अॅग्रीस्टॅकअंतर्गत फार्मर आयडीची पडताळणी केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.