Agriculture Warehouse Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Warehouse: शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम उभारणी

Warehouse Construction: राज्यातील गोदाम आधारित पुरवठा साखळी अभियानात शेतकरी कंपन्या व सहकारी संस्थांकरीता शाश्वत व्यवसाय उभारणी व शेतकरी वर्गाच्या आर्थिक बळकटीकरणासाठी शासनामार्फत शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

Team Agrowon

मंगेश तिटकारे, हेमंत जगताप

Agriculture Warehouse Design : राज्यातील गोदाम आधारित पुरवठा साखळी अभियानात शेतकरी कंपन्या व सहकारी संस्थांकरीता शाश्वत व्यवसाय उभारणी व शेतकरी वर्गाच्या आर्थिक बळकटीकरणासाठी शासनामार्फत शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी शासनामार्फत १०० दिवसांत १०० गोदामे उभी करण्यासाठी सहकार विभागाला आदेश देण्यात आले आहेत.

त्यानुसार गोदामे उभी करून धान्य साठवणूक, वखार पावती अथवा धान्य तारण योजनेसारखे व्यवसाय उभारणीसाठी शेतकरी वर्गाला पर्यायी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. परंतु महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाकडे गोदाम उभारणीसाठी मार्गदर्शन घेणाऱ्या विविध शेतकरी वर्गाच्या मागणीनुसार गोदाम उभारणीसाठी जागेची उपलब्धता व त्यानुसार गोदाम उभारणी खर्च या तपशीलाची माहिती मिळणे आवश्यक होते. गोदाम उभारणी करण्यासाठी आवश्यक तपशीलवार माहिती आजच्या लेखात माहिती घेऊ.

सदर माहिती महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या अभियांत्रिकी शाखेकडून प्राप्त झालेली आहे. या माहितीच्या आधारे इच्छुक लाभार्थी वर्ग योग्य पद्धतीने गोदाम उभारणीचे नियोजन व त्यासोबतच अत्यंत आवश्यक असणारे आर्थिक नियोजन करू शकतील.

गोदाम उभारणी करताना काही ठोकताळे व सूत्रांचा वापर करण्यात येतो. गोदामाचे प्लॅन, इस्टिमेट, डिझाइन, क्वेरी चार्ट (Quarry Chart), रॉयल्टी चार्जेस वगैरे घटकांबाबत याआधी माहिती घेतली आहे. त्यासोबतच गोदाम उभारणी करताना काही ठोकताळे सुद्धा आपण पाहिलेले आहेत.

परंतु महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या दिनांक १६ जुलै १९८२ च्या परिपत्रकानुसार नव्याने बांधण्यात येणाऱ्या व भाडे तत्त्वावर घेण्यात येणाऱ्या गोदामांची क्षमता मोजण्यासाठी केंद्रीय वखार महामंडळाने शिफारस केलेल्या ठोकताळ्यांची व सूत्रांची माहिती घेणे आवश्यक आहे. या माहितीचा उपयोग वैज्ञानिक पद्धतीचे प्रमाणित गोदामाची उभारणी करण्यासाठी व गोदामे भाड्याने घेताना व देताना नक्कीच होऊ शकेल.

केंद्रीय वखार महामंडळाने देशातील सर्व राज्य वखार महामंडळांना नव्याने बांधण्यात येणाऱ्या व भाडे तत्त्वावर घेण्यात येणाऱ्या गोदामांच्या क्षमतेची मोजणी करण्यासाठी ११ जून १९८२ रोजी राज्य वखार महामंडळाच्या संचालकांशी झालेल्या बैठकीत गोदाम क्षमतेच्या ठोकताळ्यांबद्दल व सुत्रांबद्दल चर्चा केली. या संचालक मंडळाच्या बैठकीत अंतिम केलेल्या गोदाम क्षमतेच्या ठोकताळ्यांना केंद्रीय वखार महामंडळाने मान्यता देऊन ते ठोकताळे व सूत्र देशभर लागू करण्यास परवानगी दिली.

सोबत देण्यात आलेल्या चौकटीमध्ये गोदामाची क्षमता, प्लॉट साईज, क्षेत्र, गोदाम उभारणीचा एकूण खर्च व प्रति मेट्रिक टन खर्च या व्यतिरिक्त रस्ते, तारेचे कुंपण, इलेक्ट्रीफिकेशन, लॅब चार्जेस, जीएसटी व विमा इत्यादींचा खर्च याचा तपशील देण्यात आला आहे. तसेच गोदाम क्षमतेच्या प्रमाणात एकूण किती गुंठे जागा लागणार आहे, याचा तपशील या चौकटीमध्ये सुलभ माहितीच्या अनुषंगाने देण्यात आला आहे.

गोदामातील वापरण्यायोग्य जागेत पोत्यांच्या थरांचे आकारमान

गोदामाची वापरण्यायोग्य क्षमता शक्यतो लांब, रुंदी व उंची यांचा एकत्रित गुणाकार करून काढण्यात येते. अन्नधान्याच्या पोत्यांची थप्पी अथवा पोत्यांचे थर लावूनही गोदामातील संपूर्ण जागेचा वापर होत नाही. पोत्यांचे एकावर एक असे १० ते २२ थर लावण्यात येतात. पोत्यांच्या अशा एका समूहाला ‘स्टॅक’ असे संबोधले जाते. गोदामामधे १५० टनांचा एक स्टॅक लावण्यात येतो.

गोदामातील पोत्यांच्या प्रत्येक स्टॅकभोवती किमान १ मीटर जागा सोडणे आवश्यक असते. पोत्यांचे थर लावणे, पोती आवश्यकतेनुसार चढ उतार करणे, धान्य साठ्याची तपासणी करणे, कीड नियंत्रणासाठी गोदामात औषधांची धुरळणी करणे, गोदामातील पोत्यांची वेळोवेळी संख्या मोजणे इत्यादी अनेक उद्देशांसह गोदामातील धान्याची साठवणूक केलेल्या ठिकाणचे वातावरण हवेशीर राहण्यासाठी पोत्यांच्या थरांमधे मोकळी जागा असणे आवश्यक असते. गोदामातील पोत्यांच्या दोन स्टॅकदरम्यान १ मीटर ऐवजी २ मीटर जागा सोडणे शक्य असल्यास तेवढी जागा सोडावी.

गोदाम खूप मोठे व लांब असल्यास गोदामाच्या मध्यवर्ती भागात ४ ते ६ मीटर जागा सोडून दोन्ही बाजूस पोत्यांच्या स्टॅकचे व्यवस्थापन करावे. या जागेस ‘गँगवे’ म्हटले जाते. प्रत्येक स्टॅकमध्ये १ ते २ मीटर जागा सोडावी.

गोदाम क्षमता काढण्याचे ठोकताळे व सूत्र

 गोदामाची उंची १६ फूट किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा परिस्थितीत गोदामामध्ये स्टँडर्ड आकाराच्या पोत्यात धान्य भरून साठवणूक केल्यास ६ चौरस फूट जागेत १ मेट्रिक टन धान्याची साठवणूक होते.

 गोदामाची उंची १६ फुटांपेक्षा कमी असेल, तेव्हा स्टँडर्ड आकाराच्या पोत्यात धान्य भरून साठवणूक केल्यास १५ पेक्षा कमी थर बसतात. उदा. गोदामाची उंची १३ फूट असे गृहीत धरल्यास, स्टँडर्ड आकाराच्या पोत्यात धान्य भरून साठविल्यास जास्तीत जास्त १२ पोत्यांची थप्पी अथवा थर बसू शकतील.

त्यामुळे गोदाम क्षमता कमी होऊन त्याचे गुणोत्तर १२/१५ असे असेल. त्यानुसार गोदामाच्या कारपेट एरियाला (गोदामाच्या भिंतीच्या आतील जागा) ६ ने भागल्यास १२/१५ या गुणोत्तराने गुणल्यास त्या गोदामाची गोदाम क्षमता किंवा साठवणूक क्षमता मिळेल.

 यावरून असेही अनुमान काढता येते की, गोदाम क्षमता गोदामाच्या उंचीवर अवलंबून असते. म्हणजेच गोदामाची उंची जेव्हा १६ फुटांपेक्षा कमी असते, त्यावेळी गोदामाच्या भिंती सोडून आतील भाग (कार्पेट एरिया) चौरस फुटांत घेतल्यास त्याला ६ ने भागावे (लांबी × रुंदी / ६) व त्याला खालील गुणोत्तरांनी गुणावे.

गोदामाची उंची गुणोत्तर

१८ फूट १५/१५

१७ फूट १५/१५

१६ फूट १५/१५

१५ फूट १४/१५

१४ फूट १३/१५

१३ फूट १२/१५

१२ फूट ११/१५

११ फूट १०/१५

१० फूट ०९/१५

उदाहरण क्रमांक : १

गोदामाचे माप ः १००’ × ४०’ × १३’

(लांबी) (रुंदी)  (उंची)

सूत्र : लांबी × रुंदी × गुणोत्तर क्षमता (मे. टन)

= १००’ × ४०’ × १२

६ १५

म्हणजेच ४८,०००

९०

गोदाम क्षमता : ५३३. मे. टन

उदाहरण क्रमांक : २

गोदामाचे माप ः ३९’ × २४’ × १६’

(लांबी) (रुंदी)  (उंची)

सूत्र : लांबी × रुंदी × गुणोत्तर क्षमता (मे. टन)

= ३९’ × २४’ × १५

६ १५

म्हणजेच ९३६

गोदाम क्षमता : १५६. मे. टन

उदाहरण क्रमांक : ३

गोदामाचे माप ः ३५’ × २८’ × ११’

(लांबी) (रुंदी)  (उंची)

सूत्र : लांबी × रुंदी × गुणोत्तर क्षमता (मे. टन)

= ३५’ × २८’ × १०

६ १५

म्हणजेच ९,८००

९०

गोदाम क्षमता : १०८. मे. टन

जागेची उपलब्धता व गोदाम निर्मिती खर्च

क्षमता मे.टन प्लॉट साइज (मी.) क्षेत्र

(चौ.मी) एकूण खर्च (रु. लाख) रु. खर्च प्रति

मे. टन गोदाम इमारत

(रु. लाख) रस्ते

(रु. लाख) तारेचे कुंपण व गेट

(रु. लाख) इलेक्ट्रीफिकेशन (रु. लाख) लॅब आणि रॉयल्टी (रु. लाख) १८ टक्के जीएसटी आणि विमा (रु. लाख) जागा (गुंठा) एकूण जागा (चौ.मी )

२१० १६.३ x ८.५ १३८.५५ ३८.५ १८३३३ २८.७६ १.३० १.०९ ०.५७ ०.३९ ६.१२ ५ ५०५.८५

४५० १७.५५ x १५.७० २७५.५३५ ५९.५० १३२०७ ४५.७१ १.३५ १.२१ ०.९१ ०.७५ ९.४८ ७ ७०८.१९

५०० १८.९६ x १५.७० २९७.६७२ ६०.४५ १२०८८ ४६.४४ १.४० १.२३ ०.९३ ०.७८ ९.६८ ९ ९१०.५३

६०० २२.१३ x १५.७४ ३४८.३२६२ ७१.०० ११७६६ ५१.९८ ४.११ १.२७ १.०३ ०.९० ११.२७ १२ १२१४.०४

१००० २८.०५ x २२.०० ६१७.१० ११५.५० ११५५४ ८६.६५ ५.५५ १.४५ १.७३ १.५९ १८.४२ १५ १५१७.५५

२००० ५६.१० x २२.०० १२३४.२० २२० १०८६१ १६३.७६ ९.६८ २.६८ ३.२७ ३.१३ ३४.६७ २२ २२२५.७४

प्रशांत चासकर ९९७०३६४१३०

(शेतमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ,

प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT