BJP Union Cabinet Agrowon
ॲग्रो विशेष

Union Cabinet : केंद्रीय मंत्रिमंडळासाठी भाजपमध्ये मंथन सुरू

Politics Update : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मधील घटकपक्षांनी केलेल्या मागण्यांवर विचार करून भाजपला मंत्रिमंडळातील रचना ठरविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या असून, गुरुवारी (ता. ६) दिवसभर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू राहिले.

Team Agrowon

New Delhi : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मधील घटकपक्षांनी केलेल्या मागण्यांवर विचार करून भाजपला मंत्रिमंडळातील रचना ठरविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या असून, गुरुवारी (ता. ६) दिवसभर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू राहिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी येत्या शनिवार किंवा रविवारी होण्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु जेडीयू व टीडीपीने दिलेल्या प्रस्तावांमुळे भाजपपुढे मंत्रिमंडळ रचनेचे संकट उभे ठाकले आहे. टीडीपीने लोकसभा अध्यक्षपदाची मागणी केल्याचे समजते.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात जी. एम. बालयोगी हे टीडीपीचे लोकसभा अध्यक्ष होते. त्याच धर्तीवर आता टीडीपीचे लोकसभा अध्यक्ष व्हावा, असा प्रस्ताव दिला आहे. याशिवाय दोन्ही पक्षांनी काही महत्त्वपूर्ण खाती मागितली आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी आज दिवसभर चर्चा झाल्या. भाजपचे नेते अमित शहा यांनी यांनी जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. या वेळी भाजपचे संघटन महासचिव बी. एल. संतोषही उपस्थित होते. या वेळी भाजपने कोणतीही खाती ठेवायची, यावर प्रामुख्याने चर्चा झाली.

भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी सुद्धा जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. विनोद तावडे हे बिहारचे प्रभारी असून या राज्यात भाजपने चांगली कामगिरी केली आहे. विविध राज्यांच्या नेत्यांशी चर्चा करण्याचे सत्र भाजपच्या नेत्यांनी सुरू केले आहे.

मंत्रिमंडळाबाबत शुक्रवारी ही अनेक नेत्यांशी चर्चा होणार आहे. एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक शुक्रवारी (ता. ७) दिल्लीत होणार आहे. यासाठी विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व विधानसभांमधील गटनेते उपस्थित राहणार आहेत. या वेळी मंत्रिमंडळाबाबत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT