PM Modi Oath Ceremony : पंतप्रधान मोदींचा शनिवारी शपथविधी?

Pm Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (ता. ५) १७ वी लोकसभा भंग करण्याची शिफारस करण्यात आली.
PM Modi
PM ModiAgrowon

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (ता. ५) १७ वी लोकसभा भंग करण्याची शिफारस करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे सोपविला आहे. मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शनिवारी (ता.८) शपथविधी होण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. परंतु या वेळी भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नसून अल्पमतातील सरकारचे नेतृत्व त्यांना करावे लागणार आहे. भाजपचे २४० खासदार निवडून आले असून, अजूनही पूर्ण बहुमतासाठी ३२ खासदारांची गरज आहे. तेलुगू देशम पार्टी (१६) व युनायटेड जनता दलाच्या (१२) खासदार व इतर पक्षांच्या भरवशावर नरेंद्र मोदी सरकार स्थापनेसाठी दावा करणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी अखेरची बैठक झाली. यात १७ वी लोकसभा भंग करण्याची रीतसर शिफारस राष्ट्रपतींकडे करण्यात आली.

PM Modi
Interview with Sachin Kalantre : नवनवीन वाण उपलब्ध करण्याचे सातत्याने प्रयत्न

यानंतर काही वेळातच पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेऊन पंतप्रधानपदासह केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत आपण या पदावर कार्यवाहक म्हणून काम करावे, असेही राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींना सुचविले आहे. रालोआच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक उद्या (ता.७) संसद भवनात होणार आहे.

PM Modi
Lok Sabha Election : 'अमर्याद पुरुषोत्तमा'चा मर्यादित विजय

मोदी यांची ‘एनडीए’च्या नेतेपदी निवड

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) नेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पक्षाच्या नेत्यांनी एकमताने अधिकृतपणे निवड केली. बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निवडून आल्यानंतर मोदींनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, ‘‘मी सर्व मित्रपक्षांचे आणि खासदारांचे आभार मानतो ज्यांनी मला ‘एनडीए’चा नेता म्हणून एकमताने निवडले आहे. एनडीएने मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा देत जोरदार एकजूट दाखवली. आघाडीच्या सदस्यांनी देशाला पुढे नेण्याच्या त्याच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला. या औपचारिक निवडणुकीसह, मोदी पंतप्रधान म्हणून काम करत राहतील व आगामी काळात एनडीए सरकारचे नेतृत्व करतील, असे मत नेत्यांनी व्यक्त केले. या वेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, टीडीपीचे नेते एन. चंद्राबाबू नायडू आदी नेते उपस्थित होते.

गरीब, महिला, शेतकऱ्यांच्या विकासाचा ठराव

गरीब, महिला, तरुण, शेतकरी आणि इतर उपेक्षित गटांसह समाजातील वंचित घटकांना मदत करण्याचा संकल्प व्यक्त करणारा ठराव ‘एनडीए’च्या बैठकीत संमत करण्यात आला. वंचित राहिलेल्या लोकांचे जीवन सुधारण्यासाठी आणि विकासाचे फायदे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचतील याची खात्री देण्याची ग्वाही यात देण्यात आली. समाजातील सर्वात असुरक्षित घटकांच्या गरजांना प्राधान्य देऊन, एनडीएचे उद्दिष्ट अधिक समावेशक आणि न्याय्य भारताची निर्मिती करण्याचे आहे, जिथे प्रत्येक नागरिकाला विकास आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध असतील. कोणालाही मागे न ठेवणारे एक मजबूत आणि समृद्ध राष्ट्र निर्माण करण्याचा सरकारचा निर्धार या ठरावातून व्यक्त करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com