Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Policy : शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ उभारली काळी गुढी

Farmers Protest : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीचे सरकार आल्यानंतर शंभर दिवसांच्या आत राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, केंद्राने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा १० टक्के जास्त भाव देऊ, अशी आश्वासने देण्यात आली होती.

माणिक रासवे

Parbhani News : राज्य व केंद्र सरकारच्या शेती व शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रविवारी (ता. ३०) परभणी येथे काळी गुढी उभारण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीचे सरकार आल्यानंतर शंभर दिवसांच्या आत राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, केंद्राने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा १० टक्के जास्त भाव देऊ, अशी आश्वासने देण्यात आली होती.

परंतु राज्यात सरकार स्थापन होऊन चार महिने होऊन गेल्यानंतर राज्याची आर्थिक स्थिती बरोबर नाही असे कारण देत कर्जमुक्ती शक्य नसल्याचे सांगत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले, की शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत पीककर्ज भरून टाकावे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार बोलले तीच सरकारची भूमिका आहे, असे वक्तव्य केले.

या वक्तव्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असताना, शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असतानादेखील कर्ज काढून शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रावर लादला जात आहे. सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये भरपूर फरक आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वासघात झालेला आहे.

इथून पुढे होणाऱ्या आत्महत्यांना सरकार जबाबदार आहे, असा इशार या वेळी देण्यात आला. शेतकरी विरोधी धोरणे राबवित असलेल्या राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध काळी गुढी उभारून करण्यात आला.

या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, मुंजा लोडे, आदिनाथ लवंदे, प्रसाद गरुड, माऊली शिंदे, सुदाम ढगे, उद्धव जवंजाळ, विकास भोपळे, पिना पाटील, सुधाकर खटिंग, रणजित चव्हाण, हनुमान अमाले, सय्यद कलीम, नामदेव काळे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT