Poultry Farming : बर्ड फ्लूमुळे भीतीचे वातावरण आहे. चिकन प्रेमींनी यामुळे धसका घेतला आहे. चिकण आणि अंडी खाल्ल्यामुळे मानसांमध्येही बर्ड फ्लू चा संसर्ग होतो. अशा बातम्या पसरवल्या जात आहेत त्यामुळे चिकण आणि अंड्याच्या मार्केटवर परिणाम होताना दिसतोय. त्यामुळे पोल्ट्रीधारकांना नुकसानीला सामोर जाव लागू शकतं. पण खरच चिकण आणि अंडी खाल्ल्यामुळे बर्ड फ्लू चा संसर्ग होऊ शकतो का? तज्ज्ञांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग वाढतोय. रोगाचा प्रादुर्भाव नसलेल्या आणि रोगमुक्त भागामध्ये मांस आणि अंडी नेहमीप्रमाणे खाणं शक्य आहे. त्यामुळे बर्ड फ्लूच्या विषाणूचा संसर्ग होण्याची भीती नसते. ज्या भागात प्रादुर्भाव आहे, तिथेही अंडी आणि मांस यांचा आहारात सुरक्षितपणे वापर केला जाऊ शकतो. फक्त अंडी आण मांस योग्यप्रकारे शिजवण गरजेच आहे. अशी माहिती पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी दिली.
बर्ड फ्लूचा विषाणू ७० अंश सेल्सिअस तापमानामध्ये नाश पावतो. भारतीय स्वयंपाक पद्धतीमध्ये सामान्यपणे यापेक्षा जास्त तापमान असून,ते विषाणूचा नाश करते. तरीही हे पदार्थ तयार करताना उकळी येईपर्यंत किमान अर्धा तास शिजवले जातात का, याकडे लक्ष द्यावे.योग्य प्रकारे शिजवलेल्या अन्नातून बर्ड फ्लू प्रसारित होत नाही. त्यामुळे कोंबड्यांच मांस आणि अंडी चांगली शिजवूनच खावीत. त्यामुळे विनाकारण भीती बाळगणे किंवा पसरवणे टाळावे.
पण बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या कोंबड्यांच्या संपर्कात आल्यास बर्ड फ्लू चा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. हे लक्षात घेऊन कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पक्षी हाताळताना पीपीई, ग्लोव्हज आणि मास्क घालणे, हात धुणे यांसारख्या विशेष काळजी अवश्य घ्यावी.
पोल्ट्री धारकांनी शेडमध्ये जंतूनाशकाची फवारणी करावी. हात पाय साबणाने स्वच्छ धुवावेत. बर्ड फ्लू नियंत्रित जैव-सुरक्षाविषयक उपाययोजनांचे कडकपणे पालन करावे. पक्षी संक्रमित नसले तरी सर्व कुक्कुटपालकांनी आपल्या फार्मवर प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत. जेणे करुन शेडमध्ये बर्ड फ्लू चा संसर्ग होणार नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.