
एव्हीयन इन्फ्लूएन्झा किंवा “बर्ड फ्लू” हा एक संसर्गजन्य रोग असून, सर्व प्रकारच्या पक्ष्यांमध्ये संक्रमित होतो. हा रोग ‘एच ५ एन १’ या विषाणूमुळे होतो. यात पक्ष्यांची मरतूक ८० ते १०० टक्क्यांपर्यंत होते. या पार्श्वभूमीवर कोंबड्यामध्ये‘बर्ड फ्लू’चे संक्रमण रोखण्यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपायांची माहिती घेऊ.
एव्हीयन इन्फ्लूएन्झा किंवा “बर्ड फ्लू” हा एक संसर्गजन्य रोग असून, सर्व प्रकारच्या पक्ष्यांमध्ये संक्रमित होतो. हा रोग ‘एच ५ एन १’ या विषाणूमुळे होतो. यात पक्ष्यांची मरतूक ८० ते १०० टक्क्यांपर्यंत होते.कोंबड्यामध्ये ‘बर्ड फ्लू’चे संक्रमण रोखण्यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपायांची माहिती घेऊ.
कोंबड्यांतील बर्ड फ्लूची लक्षणे
कोंबड्यांमध्ये फ्लूची लक्षणे तीव्र स्वरूपात दिसून येतात. या विषाणूचा रोग निर्माण करण्याचा काळ काही तास ते १४ दिवस एवढा असतो. कोंबड्या काही तासातच किंवा एक दोन दिवसांत मृत्युमुखी पडतात. कोंबड्यांचे खाणे पिणे बंद होऊन ते सुस्तावतात. नाका तोंडातून रक्तमिश्रित स्राव बाहेर येतो. तोंडाचा व डोक्याचा भाग सुजलेला दिसतो.
डोळ्यांच्या पापण्याच्या आतील भाग लाल होतो व सुजलेला दिसतो. विष्ठा हिरव्या रंगाची होते व पायांना सूज येते. पक्षी चालताना अडखळतात. पंख विखुरतात व गळतात, पक्षी निस्तेज दिसतात.अंडी उत्पन्न कमी होते.श्वसनाचा त्रास होतो, शिंका येतात व श्वास घेताना घरघर आवाज येतो. श्वासोच्छ्वासात अडथळे येऊन पक्षी दगावतात.
प्रतिबंधात्मक उपाय
बर्ड फ्लू नियंत्रित जैव-सुरक्षाविषयक उपाययोजनांचे कडकपणे पालन केले पाहिजे. पक्षी सध्या संक्रमित नसले तरी सर्व कुक्कुटपालकांनी आपल्या फार्मवर प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत.
देशी, ब्रॉयलर व अंडी देणारे पक्षी जंगली किंवा स्थलांतरित पक्ष्यांच्या संपर्कात येऊ देऊ नयेत. वन्य पक्ष्यांचा वावर असलेल्या व त्यांच्यामुळे दूषित होण्याची शक्यता असलेल्या पाण्याच्या कोणत्याही स्रोतापासून कोंबड्यांना दूर ठेवावे. फार्मवर जंगली पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करू नये.केवळ आवश्यक कामगार आणि वाहनांना फार्मवर प्रवेश करण्याची परवानगी द्यावी.फार्मवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वच्छ कपडे आणि निर्जंतुकीकरणाच्या सुविधा पुरवाव्यात.
फार्मवर प्रवेश करताना व बाहेर पडताना उपकरणे आणि वाहने (टायर्स आणि अंतगर्भागासह) पूर्णपणे स्वच्छ आणि निर्जंतुक करावे. -फार्मच्या कुंपणातील गेटवर वाहनाच्या निर्जंतुकीकरणासाठी ‘व्हेइकल डीप’ तयार करावे. त्यात पोटॅशिअम परमॅग्नेटचे द्रावण भरलेले असावे. फार्मवर येणाऱ्या सर्व वाहनांचे (कार, ट्रक) त्या द्रावणातून येतील, हे पाहावे.
--------
माहिती आणि संशोधन - स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.