Jalgaon News: ऐन सणासुदीच्या काळात पावसाने धुमाकूळ घातल्याने केळी दरांना फटका बसला आहे. यात उत्तरेकडील राज्यांत अतिपावसाने केळी वाहतूक, व्यापारावर परिणाम झाल्याने केळी बाजार दबावात आहे. .खानदेशातील केळीला उत्तरेकडील बाजाराचा मोठा आधार आहे. तसेच परदेशातील केळी निर्यातीनेही बाजारात पोकळी तयार होते. पण यंदा केळी निर्यातही रखडत सुरू आहे. दुसरीकडे उत्तरेकडे मागील अनेक दिवसांपासून अतिपावसाने नुकसान होत आहे. खानदेशातील केळीला काश्मिरात अधिकचे दर मिळतात. त्यापाठोपाठ पंजाब, दिल्ली येथील बाजारांतही केळीस उठाव असतो..Nashik Heavy Rain : पश्चिम पट्ट्यात घाटमाथ्यावर पावसाचा जोर.रस्ते, व्यापारात अडथळेपावसाने जम्मू - काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाना, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेशातील मोठ्या भागात थैमान घातले. यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. परिणामी केळी वाहतूक रोडावली. केळी बाजार अस्थिर झाला. केळीच्या वाढत्या आवकेचा दबावही होता. यामुळे केळी बाजारांवर दबाव वाढला आहे. अजूनही केळी वाहतूक सुकर नसल्याची माहिती मिळाली..केळीची आवक स्थिरखानदेशात केळीची आवक स्थिर आहे. मध्य प्रदेशातील केळीची आवक काहीशी कमी झाली आहे. तेथे रविवारी (ता. ७) केळीची २४७ ट्रक (एक ट्रक दोन ते १० टन क्षमता) आवक झाली. तेथे केळीला किमान ६२१ व कमाल १२२५ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. खानदेशातील जळगावमधील चोपडा, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव, यावल, रावेर, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात केळीची आवक होत आहे. .Heavy Rain : सिंधुदुर्गात जोरदार पाऊस.खानदेशात सध्या रोज २८५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. आवक स्थिर आहे. पण केळी दरांचा प्रश्न कायम आहे. मागील वर्षी गणेशोत्सव काळात अनेक शेतकऱ्यांना कमाल ३१०० रुपये प्रति क्विंटलचा दर केळीसंबंधी मिळाला होता. पण यंदा श्रावणमास, गणेशोत्सवात केळीचे दर दबावात राहीले. पुढे नवरात्रोत्सवात केळी दरात वाढ होईल, अशी अपेक्षा केळी उत्पादकांना आहे..उत्तर प्रदेशात मुबलक केळीदिल्ली, पंजाब, राजस्थानच्या बाजारात उत्तर प्रदेशातील केळी पोचत आहे. उत्तर प्रदेशातील केळी लागवडदेखील वाढली आहे. तेथील लखीमपूर खीरीचा बाजार केळीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच गोरखपूर व अन्य भागातही केळी उपलब्ध होत आहे. ही केळी नजीक राजस्थान, दिल्ली, पंजाबपर्यंत पोचत आहे. यामुळेदेखील खानदेशातील केळीला स्पर्धा तयार झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.