Bird Flu News : रायगडनंतर आता नांदेडमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग; अफवा आणि गैरसमज पसरू नका, प्रशासनाच्या सूचना

Bird Flu Outbreak : बर्ड फ्लू रोगाबाबत अनावश्यक भीती बाळगू नये, अफवा आणि गैरसमज पसरवू येऊ नये असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Bird Flu News
Bird Flu Newsagrowon
Published on
Updated on

Bird Flu Maharashtra : मागच्या ८ दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील उरण येथे कोंबड्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे समोर आले. यानंतर नांदेड जिल्ह्यात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. नांदेडमधील किवळा येथील कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अनेक कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्यात आली आहेत.

या संदर्भात पशूसंवर्धन विभागाने खबरदारीच्या उपाययोजना सूरू केल्या आहेत. याचबरोबर कोंबड्यांपासून माणसांना कोणताही संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच बर्ड फ्लू रोगाबाबत अनावश्यक भीती बाळगू नये, अफवा आणि गैरसमज पसरवू येऊ नये असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नांदेडमधील किवळा येथील शेतकरी पंजाब टरके यांच्या कुकुटपालन केंद्रातील कोंबड्यांची २० पिल्ले मृतावस्थेत आढळली होती. पशुसंवर्धन विभागाने या मृत पक्षांचे नमुने पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून हे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. मृत कुक्कुट पक्षांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे किवळा येथील दहा किलोमीटर परिसर अलर्ट झोन घोषीत करण्यात आला आहे.

Bird Flu News
Bird Flu : योग्य काळजी घ्या, चिंता करू नका

पशुसंवर्धन विभागाकडून सूचना

यावर पशुसंवर्धन विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजनेसाठी ५६५ कोंबड्यांची पिल्ले ताब्यात घेऊन त्यांची विल्हेवाट लावली आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरात बर्ड फ्ल्यूचा प्रसार होऊ नये यासाठी दहा किलोमीटर अलर्ट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे. या परिसरात कोंबड्यांची खरेदी-विक्रीची दुकाने, चिकन दुकाने, वाहतूक, बाजार आणि यात्रा, बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बर्ड फ्लूमुळे भीतीचे वातावरण आहे. चिकन प्रेमींनी यामुळे धसका घेतला आहे. मात्र नागरिकांनी बर्ड फ्ल्यूला घाबरू नये, चिकन खाताना चांगले शिजवून आणि स्वच्छ करून खावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बर्ड फ्लू पसरु नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहे. दरम्यान बर्ड फ्लू मुळे मासे आणि मटण खाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com