Bhimthadi Jatra Agrowon
ॲग्रो विशेष

Bhimthadi Jatra : पुण्यात भीमथडी जत्रेस सुरुवात

Pune Cultural Festival : बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, भीमथडी फाउंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणाऱ्या भीमथडी जत्रेस शुक्रवार (ता. २०)पासून सुरुवात झाली.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, भीमथडी फाउंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणाऱ्या भीमथडी जत्रेस शुक्रवार (ता. २०)पासून सुरुवात झाली.

यशस्वी महिला उत्पादकांच्या हस्ते या जत्रेचे उद्‌घाटन खडकी कॅन्टोमेंट बोर्डाच्या सीईओ मीनाक्षी लोहिया, सदस्य पूजा आनंद, आयोजिका सुनंदा पवार, सई पवार, कुंती पवार, विश्वस्त रजनी इंदुलकर, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, शंकरराव मगर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. पाटील यांच्या हस्ते झाले.

डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त यंदा ‘शेती’ ही थीम घेऊन शेती व शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, होलस्टिन फ्रिजियन गाईंचे पालन, ड्रीप इरिगेशन, रेशीम उद्योग, कुक्कुटपालन यांसारखे शेतीपूरक व्यवसायातील नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत.

या वेळी भीमथडी जत्रा ही पद्मश्री अप्पासाहेब पवार यांना समर्पित असून या संकल्पनेवर आधारित अप्पासाहेबांच्या जीवनचरित्राचा पट या जत्रेत जागोजागी पाहायला मिळत आहे. यंदा भीमथडी जत्रा १८ व्या वर्षात पदार्पण करत असून, महाराष्ट्राची कलासंस्कृती पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहेत. ग्रामीण खाद्य महोत्सवात ग्रामीण चवीचे अस्सल खाद्यपदार्थ चाखायला मिळणार आहे.

भीमथडी जत्रेला सकाळी १० ते सायंकाळी १० या वेळेत येत्या २५ डिसेंबरपर्यंत कृषी महाविद्यालय मैदान शिवाजीनगर (सिंचननगर) येथे भेट द्यावी व ग्रामीण भागातील महिला उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या प्रयत्नाला हातभार लावावा, असे आवाहन भीमथडीच्या आयोजिका सुनंदा पवार यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Installment Date : पीएम किसानच्या हप्त्याची प्रतिक्षा कायम; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Agrowon Podcast: उडदाचे भाव दबावातच; बाजरीचे दर स्थिर, कोबी- मेथीचा भाव टिकून, फ्लाॅवर दर तेजीत

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार

APMC SIT Investigation: नागपूर बाजार समितीच्या चौकशीसाठी एसआयटी

Cotton Farming : पूर्वहंगामी कापूस पिकाची वाढ जोमात

SCROLL FOR NEXT