Savitri Jatra : ‘सावित्री जत्रा २०२४’ चे नवी सांगवीत आयोजन

Umed Organization : : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषदेतर्फे ‘विभागीय मिनी सरस व जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन सावित्री जत्रा २०२४’ चे आयोजन आजपासून (ता. २६) करण्यात आले आहे.
Umed
UmedAgrowon

Pune News : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषदेतर्फे ‘विभागीय मिनी सरस व जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन सावित्री जत्रा २०२४’ चे आयोजन आजपासून (ता. २६) करण्यात आले आहे. ही जत्रा रविवारपर्यंत (ता. २८)पर्यंत सुरू राहील. नवी सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभाग व प्राचार्य प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राच्या मैदानात ही जत्रा होईल.

‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत ही जत्रा होत आहे. महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या आर्थिक उन्नतीसाठी समूहांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना व खाद्य पदार्थांना बाजारपेठ मिळण्यासाठी विक्री प्रदर्शने आयोजित करण्यात येतात.

Umed
Climatic Advice for Agriculture : ‘सल्ला’च टिकवणार शेती

त्याचाच एक भाग म्हणून आयोजिलेल्या या विभागीय जत्रेत पुणे, कोकण व छत्रपती संभाजीनगर या ३ विभागांतील १८ जिल्हे व पुणे जिल्ह्यातील १३ तालुके सहभाग घेणार आहेत. प्रदर्शनात जवळपास ८० स्टॉल आहेत.

Umed
Agricultural Commodity Export : या शेतमालाचे निर्यातीचे निकष झाले अजून कडक

सहभागी महिला सदस्यांची सांस्कृतिक स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा, अभियाना अंतर्गत गटाचे महत्त्व, विविध रोजगाराच्या संधींचे महत्त्व आदी विषयावर आधारित कार्यक्रमात महिला स्वयंसहाय्यता समूह सहभागी होतील. विविध पुरस्कारांचे वितरण, खेळांचे आयोजन हे या प्रदर्शनाचे आकर्षण आहे.

‘ग्रामीण खाद्यपदार्थ घेण्याची संधी’

‘‘या प्रदर्शनात पुणेकरांना विविध उत्पादने व अस्सल ग्रामीण चविष्ट, स्वादिष्ट, रुचकर खाद्यपदार्थ खरेदी करण्याची संधी मिळेल. ग्रामीण महिला समूहांनी बनविलेल्या वस्तूंची खरेदी करून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी हातभार लावावा. प्रदर्शनाला भेट देऊन संधीचा लाभ घ्यावा’’, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com