Marathi School Agrowon
ॲग्रो विशेष

Bhapkarwasti ZP School: भापकरवस्ती शाळा : समन्वयाचे शुभंकर चित्र

Innovative Teaching: जिल्हा परिषदेची भापकरवस्ती येथील शाळा शेवगावपासून पाच किमी दूर आहे. माजी शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या वस्तीवरील ही द्विशिक्षकी शाळा.

Team Agrowon

School Development: अहिल्यानगर जिल्ह्यातील भापकरवस्ती या शाळेत आरती तागडे या मुख्याध्यापिका आणि श्रीकांता शिंदे या सहकारी शिक्षिका कार्यरत आहेत. समर्पण भावनेने अध्यापन करणाऱ्या या शिक्षिकांमुळे विद्यार्थी गुणवत्तेत काकणभर सरस ठरतील असेच आहेत. शाळेत येणारी शेतकरी, कष्टकरी पालकांची मुले म्हणजे जणू आपलीच मुले हे ब्रीद मनीमानसी बिंबवत तन, मन, धनाने कार्यरत राहिल्याने भापकरवस्ती शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आणि वक्तृत्व, चित्रकला, पाठांतर, नृत्य अशा विविध स्पर्धा आणि परीक्षेतील यशस्वी सहभागाचा आलेख सतत वाढता राहिला आहे.

पाढे पाठांतर

दैनंदिन व्यवहारात आणि शाळेतील गुणाकार व भागाकार या गणिती क्रियांसाठी पाढे पाठांतर उपयुक्त ठरते. त्यामुळे या क्रिया लवकर होतात. हे लक्षात घेऊन पाढे पाठांतर हा उपक्रम या दोन्ही शिक्षिकांनी शाळेत सुरू ठेवला. याचा परिणाम म्हणून इयत्ता चौथी मधील कु. शुभ्रा म्हस्के ही विद्यार्थिनीचे पन्नासपर्यंत पाढे पाठ आहेत. तर श्रीरंग बोडखे या इयत्ता पहिली मधील विद्यार्थ्याचे वीस पर्यंत पाढे पाठ आहेत. स्पर्धात्मक वातावरणामुळे बहुतेक सर्व विद्यार्थ्यांचे तीसपर्यंत पाढे पाठ आहेत.

ज्ञानरचनावादी डायनिंग टेबल

हा या शाळेचा खास उपक्रम आहे. या शाळेत विद्यार्थ्यांसाठी काळी फरशी असलेला डायनिंग टेबल असून त्यावर विद्यार्थी गणितीक्रिया मुक्तपणे करतात, भाषिक खेळ खेळतात, कोडी सोडवतात इथल्या छतावर आणि बाजूच्या खांबावर गणिती सूत्रे, पाढे रंगवलेली असल्याने ती नेहमी विद्यार्थ्यांकडून वाचली व पाठ केली जातात. या उपक्रमासाठी पालकांनी साठ हजार रुपये व शिक्षिकांनी वीस हजार रुपये खर्च केले.

ज्ञानरचनावादी शिक्षण, आनंददायी शिक्षण, वाचन प्रेरणा या शासकीय उपक्रमासोबतच मुलांना व्यवहारज्ञान शिकवण्यासाठी आनंदी बाजार, निसर्ग व पर्यावरण रक्षण आणि जतन करण्याचा संस्कार देण्यासाठी ‘चला ऑक्सिजन पेरूया’, वृक्षदिंडी, विविध भौमितिक आकारांच्या वाफ्यात असलेली परसबाग, ‘एक ओंजळ धान्याची हा संवेदनशीलता आणि समाजभान देणारा उपक्रम राबवला जातो. आनंददायी नवनिर्मिती क्षमता वाढीस लागावी यासाठी गणपती बनवा, पणती बनवा असे मातीशी नाते जोडणारे भापकरवस्ती शाळेतील उपक्रम आता आजूबाजूच्या शाळेतही पोहोचले आहेत.

बाल वयोगटाच्या मुलांनी अवश्य वाचायला हवीत अशा बालसाहित्याने समृद्ध वाचनालय शाळेत आहे. शासकीय स्तरावरून आलेल्या पुस्तकांसोबतच मुख्याध्यापिका आरती तागडे यांनी स्वतः आपल्याकडील वाचनीय बालसाहित्याने हे वाचनालय समृद्ध केले आहे. या शाळेला कवी दासू वैद्य, राजीव तांबे, भरत दौंडकर, हेरंब कुलकर्णी, दिनकर गांगल, डॉ. पुरुषोत्तम भापकर, नागराज मंजुळे, रिमा अमरापूरकर, नंदू माधव, प्रकाश पारखी आदी मान्यवरांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून कौतुक केले आहे.

परीक्षेनंतरच्या कालावधीत पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळेत बालसंस्कार शिबीर घेतले जाते. यात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अभिनय प्रशिक्षण शिबीर, खेळ यांचे परिसरातील तज्ज्ञामार्फत कृतिसत्रे आयोजित केली जातात. शाळा सुशोभीकरण व पाण्याचा हौद यासाठी आरती तागडे यांनी स्वतः छप्पन हजार रुपये खर्च केलाय. संरक्षक भिंत रंगवण्यासाठी पालकांनी छत्तीस व शिक्षिकांनी चौदा हजारांचे योगदान दिले आहे. डॉ. भापकर साहेबांनी शाळा डिजिटल करण्यासाठी पन्नास हजारांची मदत शाळेला दिली.

इंग्रजी व मराठी लेखन व वाचन, संभाषण, गणिती आकडेमोड, यात विद्यार्थी अग्रेसर आहेत. या शाळेत दरवर्षी आसपासच्या गावातीलही पालक मुले दाखल करतात. इंग्रजी माध्यमांच्या शाळेतून काही पालकांनी आपली मुले या शाळेत दाखल करत समाधान व्यक्त केले आहे. या शाळेत चक्क शेवगाव शहरातील काही सुशिक्षित पालकांनी आपली मुले दाखल केली आहेत. श्रीकांता शिंदे मॅडम या जिल्हा व राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेल्या असून त्या लेखिका व सुत्रसंचालिकाही आहेत तर मुख्याध्यापिका आरती तागडे या तंत्रस्नेही असून युट्यूब वरील त्यांचे शैक्षणिक व्हिडिओ विद्यार्थी व शिक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांना रोटरीचा नेशन बिल्डर अवॉर्ड प्राप्त झालेला आहे. भापकरवस्ती शाळा हे शिक्षिका, विद्यार्थी व पालक यांच्या समन्वयाचे यशस्वी व प्रगतिशील उदाहरण आहे.

आरती तागडे ९९२१२८४६००

(लेखक नामांकित साहित्यिक व शिक्षक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT