Nagpur News: नागपूर येथे सोमवार (ता. ८)पासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कृषी विभागाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी किती निधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. .कृषी समृद्धी योजनेसह कृषी विद्यापीठे, अन्य योजनांसाठी सहा हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. पुरवणी मागण्या मान्य झाल्यास किती निधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे..Nagpur Winter Session: अधिवेशनात नऊ हजार प्रश्नांची सरबत्ती.कर्जमाफी, अतिवृष्टिग्रस्तांसाठी जाहीर केलेले पॅकेज, भ्रष्ट कृषी अधिकाऱ्यांची चौकशी आणि अन्य विषयांवरून अधिवेशनात वादळी चर्चेची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून अतिवृष्टी, शेतकरी मदतीमधील भ्रष्टाचार आणि निवडणूक व्यवस्थापनातील कथित गोंधळ, मराठा-ओबीसी तणाव आणि राज्याच्या आर्थिक स्थितीवर सरकारला घेरण्याची शक्यता आहे..तर दुसरीकडे महायुती सरकारकडून ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या दीर्घकालीन विकास आराखड्याच्या सादरीकरणासह सरकारची गेल्या वर्षभरातील कामगिरी, विविध क्षेत्रातील विकासाचे नवे मानदंड, डिजिटल सेवांमुळे वाढलेली पारदर्शकता आणि प्रशासनातील सुधारणा अधोरेखित करण्यात येणार आहेत..Parliament Winter Session: निवडणूक सुधारणा आणि एसआयआरवर संसदेत मंगळवारी होणार महाचर्चा .सरकारने शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या ३१ हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजचा, तसेच नोव्हेंबरमध्ये केंद्राकडे पाठवलेल्या पूरनुकसान अहवालावरून घमासान चर्चेची शक्यता आहे.अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी तसेच पीकविम्याची रखडलेली रक्कम यावरूनही सर्वपक्षीय आमदारांत नाराजी आहे..स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अलीकडील निवडणुकांतील गोंधळ हा मुद्दा विरोधक जोरात उपस्थित करणार आहेत. बारा जिल्ह्यांतील नगरपालिका निवडणुका पुढे ढकलणे हा ‘योजनाबद्ध’ डाव असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. या निवडणुकीत झालेला रोख पैशांचा उघड वापर आणि ‘लक्ष्मी दर्शन’ यावरूनही सरकारला चांगलेच अडचणीत आणण्याचा विरोधकांचा प्लॅन आहे..राजकीय संघर्षाची शक्यतासरकारकडून मात्र विरोधकांचे सर्व आरोप राजकीय प्रेरित असल्याचे सांगितले जात आहे. निवडणुका पुढे ढकलण्यामागील कारणांबाबत सरकार उच्च न्यायालयाचा दाखला देणार असून निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेबद्दल असमाधान व्यक्त करीत स्वतःला त्या गोंधळापासून दूर ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. अवघ्या सात दिवसांच्या या सत्रात प्रत्यक्ष विधायक कामापेक्षा राजकीय संघर्ष जास्त होण्याची शक्यता असून महत्त्वाच्या विधेयकांच्या मंजुरीवर सरकारचा भर राहणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.