
Nashik News : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) प्रायोजित मराठा, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी, आणि कुणबी प्रवर्गातील व्यक्तींसाठी ३ व ५ दिवसीय कृषी विज्ञान केंद्राद्वारे अल्प मुदतीचे कृषी तंत्रज्ञान निवासी प्रशिक्षण तसेच मूल्यवृद्धी, ब्रँडीग व मार्केटिंग विनामूल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्रावर आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी तसेच युवक, युवती यांच्यासाठी अल्प मुदतीचे कृषी तंत्रज्ञान निवासी प्रशिक्षण नाशिक जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र, गंगापूर रोड, नाशिक येथे आयोजित केले आहे. यामध्ये शेळीपालन व कुक्कुटपालन व्यवसाय तसेच ऑयस्टर मशरूम उत्पादन आणि प्रक्रिया तंत्रज्ञानचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे:
मराठा प्रवर्गाकरिता शाळा सोडल्याचा दाखला अथवा जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र,तहसीलदार यांचे मागील वर्षांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, हमीपत्र, आधारकार्ड, दोन पासपोर्ट रंगीत फोटो, कोड ऑफ कंडक्ट बाबत हमी पत्र, अधिवास दाखला, बँक खाते तपशील इत्यादी कागदपत्र आवश्यक असतील. तरी इच्छुकांनी या संकेतस्थळावर ३० जून, २०२५ पर्यंत सादर करावे.ऑनलाइन अर्ज सादर केल्यावर कागदपत्रे हार्ड कॉपी १५ दिवसांच्या आत सारथी संस्थेस पाठविण्यात यावे.
लाभार्थी निवड अटी व शर्ती :
प्रशिक्षणासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. तसेच मराठा,कुणबी,कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गातील असावा.उमेदवाराचे वय १८ ते ५५ दरम्यान असावे. यासाठी लाभार्थ्यांचे मागील वर्षांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असावे.प्रशिक्षणासाठी अर्जदार किमान दहावी पास असावा. सारथी पुणे मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा याअगोदर लाभ घेतलेला नसावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.