Mumbai News : ‘‘२०१४ पासून आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बजेट ३.७५ पट वाढले आहे, ज्यामुळे भारताच्या गावांप्रती सरकारची अटळ बांधिलकी स्पष्ट होते. सहकार, ग्रामीण विकास आणि पशुपालन हे आपल्या विकासाच्या केंद्रस्थानी आहेत. तसेच ‘नाबार्ड’ त्यांना सक्षम करण्याचे कार्य पुढेही करत राहील. आपण असे भविष्य घडवत आहोत जिथे ५० कोटी भारतीय सहकारितेशी जोडलेले असतील, आणि त्यांचे देशाच्या जीडीपीतील योगदान तीनपट वाढेल. त्यामुळे विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यामध्ये ग्रामीण भारत एक निर्णायक शक्ती ठरेल,’’ असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी केले..भारताच्या सहकारी आणि ग्रामीण विकासाच्या व्यापक प्रगतीसाठी महात्मा मंदिर कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटर गांधीनगर येथे अर्थ समिटच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद््घाटन श्री. शाह यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी श्री. शाह यांनी अर्थ समिटदरम्यान ‘सहकार सारथी’अंतर्गत १४ अग्रगण्य डिजिटल सेवांचे अनावरण केले..India Development: अन्न सुरक्षिततेतून साकार होईल विकसित भारताचे स्वप्न.या वेळी डिजिटली सक्षम सहकार व्यवस्थेकडे एक निर्णायक पाऊल उचलत त्यांनी ‘सहकार सारथी प्रायव्हेट लिमिटेड’चा प्रारंभ केला. हे एक अग्रगण्य सामायिक-सेवा आधारित तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म असून, ग्रामीण सहकारी बँकिंग परिसंस्थेचा कायापालट करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. भविष्याभिमुख ग्रामीण अर्थकारण समिटचा केंद्रबिंदू आहे. श्री. शाह यांनी नाबार्ड-बीसीजीची ‘द फ्यूचर ऑफ रुरल बँकिंग’ हा रिपोर्टदेखील प्रसिद्ध केला..हा रिपोर्ट ग्रामीण कर्जप्रवेश मजबूत करणे, सेवांची गुणवत्ता उंचावणे आणि भारताच्या ग्रामीण बँकिंग क्षेत्राची संस्थात्मक कार्यक्षमता वाढवणे यासाठी रणनीतिक मार्गदर्शक तत्त्वे सादर करते.अर्थ समिट हे आपल्याला स्मरण करून देते की जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी जगाने प्रथम ग्रामीण समस्या सोडवणे आवश्यक आहे, असेही श्री. शाह म्हणाले..Developed India: दिशा विकसित भारताची!.गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी ग्रामीण नवकल्पना आणि सहकारआधारित प्रगतीबाबत राज्याची बांधिलकी अधोरेखित करताना म्हणाले, ‘‘गुजरात भारताचे विकास इंजिन आहे आणि अर्थ समिटमध्ये समाविष्ट ग्रामीण तंत्रज्ञान क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.’’.सहकार सारथी फक्त एक डिजिटल प्लॅटफॉर्म नाही. हे आपल्या सहकारी बँकिंग क्षेत्राचे नवीन भविष्य आहे. असे भविष्य जिथे प्रत्येक PACS, प्रत्येक डेअरी आणि शेतीशी संबंधित संस्था तसेच प्रत्येक ग्रामीण समुदायाला उत्कृष्ट तंत्रज्ञान, उत्कृष्ट सेवा आणि मजबूत नेटवर्क प्राप्त होईल.शाजी के. व्ही., अध्यक्ष, नाबार्ड.अर्थ समिट दृष्टिक्षेपात- देशभरातील साठवण सुविधा डिजिटलरीत्या निरीक्षण करण्यासाठी जगातील सर्वात मोठे धान्य साठवण योजना पोर्टल या प्रसंगी लाँच केले.- सायबर सुरक्षा, अनुपालन आणि संचालन अधिक सुदृढ करण्यासाठी एक्सपर्ट-एज-ए-सर्व्हिस प्लॅटफॉर्म जसे की CISO सारथी, टॅक्स सारथी, CBS सारथी आणि रेग्युलेटरी कंप्लायन्स सारथीची घोषणा केली.- कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी शिक्षण सारथी आणि संपूर्ण क्षेत्रातील CTOs आणि CISOs साठी सहकार्य मंच देखील सुरू केले गेले.- bank.in माइग्रेशन, AI-संचालित क्रॉस सेल सारथी, कॅम्पेन सारथी आणि एकत्रित कलेक्शन्स सारथी कॉल-सेंटर सेवा यांसारख्या अतिरिक्त सेवाही सुरू करण्यात आल्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.