Kolhapur News: दिवाळीनंतर मंदावलेली साखरेची मागणी अद्यापही कायम आहे. सध्या देशात मुबलक साखर तयार होत असल्याने खरेदीदार साखरेसाठी फारसे उत्सुक नसल्याचे चित्र आहे. सध्या फक्त गरजे इतकीच किमान खरेदी सुरू आहे..सध्या साखरेचे दर देशात राज्यानुसार क्विंटलला सरासरी ३७०० ते ३८०० रुपयांच्या आसपास आहेत. देशभरातील बहुतांश कारखान्यांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गाळपाला चांगली गती मिळवली. ऊस उपलब्धता, वाहतूक आणि हवामान या सर्व बाबी अनुकूल असल्याने उत्पादनात कोणतीही अडचण नाही. याच पार्श्वभूमीवर बाजारात पुरवठा वाढल्याने दर स्थिर राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली..Sugar Industry: दौंडमध्ये कारखान्यांचे ऊसदराबाबत मौनच.व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जुनी साखर आणि नव्या साखरेचा एकत्रित पुरवठा वाढत असल्यामुळे बाजारावर कोणताही दबाव नाही. त्यामुळे सध्यातरी मोठा तेजीचा कल दिसत नाही..आगामी पंधरवड्यात गाळपाचा वेग कायम राहिल्यास आणि नवीन साखरेचा पुरवठा वाढत गेल्यास साखरेच्या किमती स्थिर राहण्याची शक्यता बाजार सूत्रांनी व्यक्त केली. आगामी काळामध्ये देशात संक्रांतीपर्यंत कोणतेही मोठे सण नसल्याने साखरेची मागणी फारशी नसल्याचे सांगितले..Sugar Production: साखर उत्पादनात महाराष्ट्र अव्वल.हिवाळा होईपर्यंत साखरेच्या दरात फारशी वाढ अपेक्षित नसल्याचे बाजारातून सांगण्यात आले. महाराष्ट्रात एम ग्रेड साखरेला प्रति क्विंटल ३७०० ते ३८००, उत्तर प्रदेशात ४००० ते ४१००, कर्नाटकात ३९०० ते ४०००, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये ३८०० ते ३९००, रुपये इतके दर सध्या आहेत..कारखानदारांचे ‘वेट अँड वॉच’साखरेचे उत्पादन वाढत असले, तरी आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर कमी असल्याने निर्यातीबाबत मात्र अद्यापही कारखानदारांनी ‘वेट अँड वॉच’चीच भूमिका घेतली आहे. काही कारखाने शेजारील राष्ट्राकडून साखरेच्या मागणीबाबत चाचपणी करत आहेत. अद्यापही निर्यात करार अथवा पाठवणी बाबत कारखानदार फारसे उत्सुक नसल्याचे चित्र आहे..बाजारातील कल सध्या साखर बाजारात मोठे उतार-चढाव दिसण्याची चिन्हे नाहीत. गाळपाची गती वाढल्यामुळे डिसेंबर महिन्यातही पुरवठा अधिक राहण्याची शक्यता. खरेदीदार ‘गरजेनुसार खरेदी’ या धोरणावर असून, मोठ्या प्रमाणात स्टॉकिंग टाळण्याचे प्रयत्न. आगामी दहा पंधरा दिवस तरी दर स्थिर राहतील, अशी उद्योग तज्ज्ञांची अपेक्षा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.