Nashik News: बांगलादेश सरकारने देशांतर्गत कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासह कांदा उपलब्धतेसाठी भारतामधून आयातीला मर्यादित प्रमाणात परवानगी दिली आहे. यासंबंधीच्या निर्णयाचे परिपत्रक जारी केले आहे..ऑगस्ट महिन्यापासून आतापर्यंत ज्या आयातदारांनी नोंदणी केली आहे. त्यांना दररोज मर्यादित ५० परवाने देण्यात येणार आहे. प्रत्येकी मर्यादा ३० टनांपर्यंत असणार आहे. त्यानुसार दररोज सरासरी १५०० टन कांदा बांगलादेश आयात करणार आहे. भारतीय कांद्याचा प्रमुख ग्राहक असलेल्या बांगलादेशने हा निर्णय घेतल्याने दरवाढीची शक्यता आहे..Onion Price Issue: आठ रुपयांत कांदा विकायचा तरी कसा? शेतकरी हवालदिल.बांगलादेशमधील कांद्याची मागणी आणि उपलब्धता पाहता दर स्थिर ठेवण्यासाठी आयातीला बांगलादेश सरकारच्या कृषी मंत्रालयाने परवानगी दिली आहे. त्यानुसार रविवार (ता. ७)पासून मर्यादित आयात परवाने देण्यात येतील. १ ऑगस्ट २०२५ ते आतापर्यंत आयात परवानगीसाठी अर्ज केलेले आयातदार अर्ज पुन्हा सादर करण्यास पात्र असणार आहेत. प्रत्येक आयातदाराला फक्त एकदाच अर्ज करण्याची परवानगी असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे..तूर्तास डिसेंबर महिन्यात आयातीला परवानगी असणार आहे. ‘मुरिकाटा’ हा बांगलादेशातील कांद्याचा एक विशिष्ट प्रकार आहे. त्याची बांगलादेशातील स्थानिक बाजारात आवक होत आहे. मात्र मागणीच्या तुलनेत कांद्याची उपलब्धता कमी आहे..Onion Subsidy Delay: कांदा अनुदान वितरण प्रक्रिया रखडलेलीच!.त्यामुळे कांद्याची उपलब्धता आणि दरात अस्थिरता आणण्यासाठी बांगलादेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. पुढे आवक व उपलब्धतेची माहिती घेऊन पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, असे हॉर्टिकल्चर प्रोड्यूसर एक्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले..बांगलादेशातील आयातदारांकडून चौकशी सुरूविशिष्ट चव, वास व औषधी गुणधर्मामुळे भारतीय कांद्याला जागतिक बाजारपेठेत मागणी आहे. त्यामध्ये बांगलादेश हा प्रमुख आयातदार देश आहे. मात्र केंद्र सरकारने ग्राहकहिताला प्राधान्य देत कांदा निर्यात बंदीसारखे निर्णय घेतले. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत भारतातून कांद्याची निर्यात अडचणीत सापडली. .त्यामुळे बांगलादेशने देखील चीन, पाकिस्तान सारख्या देशांना कांद्यासाठी प्राधान्य दिले. तर भारतातून या प्रमुख आयातदार देशात रस्ते वाहतूक मार्गाने निर्यात जवळपास ठप्प आहे. रविवारी (ता.७) सुट्टी होती. मात्र बांगलादेशातील आयातदारांनी नाशिकमधील काही निर्यातदारांकडे कांद्यासंदर्भात चौकशी करून दराचा आढावा घेतला आहे. सोमवार (ता. ८)पासून दराचे चित्र स्पष्ट होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.