Bank Crowd Agrowon
ॲग्रो विशेष

CM Ladki Bahin Scheme : खात्यातून पैसे काढण्यासाठी लाभार्थ्यांची बँकेसमोर गर्दी

Bank Crowd : आपल्या खात्यात हा मदतनिधी आला की नाही, हे तपासण्यासाठी बँकांमध्ये महिलांची मोठी गर्दी झाली आहे.

Team Agrowon

Mumbai News : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत. आपल्या खात्यात हा मदतनिधी आला की नाही, हे तपासण्यासाठी बँकांमध्ये महिलांची मोठी गर्दी झाली आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळत आहेत. दोन महिन्यांचे एकत्रित पैसे काढण्यासाठी त्या बँकांमध्ये धाव घेत आहेत.

डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागातील कासा येथील बँक ऑफ महाराष्ट्र आणि ठाणे जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये सध्या महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या गर्दीमुळे अन्य ग्राहकांच्या कामात अडथळा येत असून बँक व्यवस्थापनावर मोठा ताण निर्माण झाला आहे.

काही महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण नसल्यामुळे त्यांचे पैसे जमा झालेले नाहीत, तर काही महिला पासबुक अपडेट करण्यासाठी रांगा लावत आहेत. ग्रामीण भागातील सुमारे ७० टक्के महिलांकडे मोबाईल नसल्याने त्या प्रत्यक्षात बँकेत येऊन पासबुकवर पैसे जमा झाल्याचे तपासण्यासाठी, तसेच आल्यास ते काढण्यासाठी गर्दी करत आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक महिला नव्याने अर्ज भरत आहेत. यासाठी सेतू कार्यालये, सरकारी सेवा केंद्रे, महा ई-सेवा केंद्रे आणि खासगी ऑनलाइन केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. आधार लिंक नसल्यामुळे आणि केवायसी प्रक्रियेत उशीर झाल्यामुळे अनेक महिला बँकेत येत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CSR Funding Issue: सीएसआर निधी खर्चातील विसंगती

Festival Noise Pollution: गोंगाटात हरवलेला उत्सव

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

SCROLL FOR NEXT