Ladki Bahin Yojana : बहिणींना लखपती झाल्याचे पाहायचे आहे : मुख्यमंत्री शिंदे

Eknath Shinde : सरकारची ताकद वाढली, तर योजनेचे आर्थिक बळ वाढणार आहे. यामुळे योजनेची व्याप्ती वाढविणारे सरकार हात आखडता घेणार नाही,’’ असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले.
Majhi Ladki Bahin Yojana
Majhi Ladki Bahin Yojana Agrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण आई आणि बहीण आहे. बहिणींना लखपती झाल्याचे पाहायचे आहे. बहिणींना आत्मनिर्भर करणे आणि आत्मसन्मान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सरकारची ताकद वाढली, तर योजनेचे आर्थिक बळ वाढणार आहे. यामुळे योजनेची व्याप्ती वाढविणारे सरकार हात आखडता घेणार नाही,’’ असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले.

बालेवाडी येथे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेस मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शनिवारी (ता.१७) झाला. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजीत पवार, महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, खासदार उपस्थित होते.

Majhi Ladki Bahin Yojana
'Majhi Ladki Bahin' Scheme : सर्वोच्च न्यायालयाने ताशोरे ओढले नाहीत; महसूल विभागाचा खुलासा 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘आज योजनचे उद्‍घाटन नाही तर वचनपूर्ती सोहळा आहे. ‘लाडक्या बहिणीं’च्या आनंदाचा क्षण आहे. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहिले, याचे समाधान आहे. आपल्या ‘लाडक्या बहिणीं’साठी योजना आणली पाहिजे या विचारातून सरकारने योजना आणली.

मात्र बहिणींना लाच देताय का? विकत घेताय का? भावांचं काय अशी टीका केली गेली. विरोधक न्यायालयात पण गेले, मात्र न्यायालयाने विरोधकांना चपराक देत बहिणींना न्याय दिला. युवा प्रशिक्षण योजना, शेतीपंप वीजबिलमाफी दिली. अन्नपूर्णा योजना आणून ३ गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय आम्ही घेतला.’’

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, ‘‘माझ्या राजकीय जीवनातील सर्वांत आवडीची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना असून, आज या योजनेचा शुभारंभ होत आहे. हा सर्वांत आनंदाचा दिवस आहे. पुढे पाच वर्षे या योजनेसह वीजबिलमाफी, मुलींना मोफत शिक्षण या सर्व योजना चालू ठेवायचं की नाही, हे तुमच्या हातात आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हाला मतदान करा, असे आवाहन करतो. कांद्याची निर्यात बंदी कायमची उठवायची आहे. यासाठी प्रयत्नशील आहोत. म्हणून केंद्र सरकारच्या विचारांचे सरकार विधानसभेत पाहिजे.

Majhi Ladki Bahin Yojana
'Majhi Ladki Bahin' Scheme : लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा तर मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘आपलं सरकार वसुली सरकार नसून, देना बँक सरकार आहे. लाडकी बहीण योजनेत १ कोटी ३ लाख बहिणींच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे महिलांचा विकास झाला, तरच देशाचा विकास होणार आहे. यासाठी महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना सरकार राबवत आहे. महिलांना अर्थव्यवस्थेमध्ये भागीदारी मिळाली पाहिजे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे.’’

सावत्र भावांना पुरून उरलोय : मुख्यमंत्री शिंदे

बहीण-भावांचा सण जगात कुठेही नाही, फक्त हिंदू संस्कृतीत आहे. या निमित्ताने मला लाखो बहिणी मिळाल्या, तुमचे प्रेम मला ऊर्जा देणार आहे. या ऊर्जेवर पुरून उरलोय. टीकाकार सावत्र भावांना पुरून उरलोय, त्यांना योग्य जागा दाखवा... बहिणींच्या प्रेमामुळे सरकार अधिक बळकट झालंय.

सत्तेचा उपयोग स्वतःची तिजोरी भरण्यासाठी नाही, तर सर्वसामान्यांच्या सुखसमधानाचे दिवस आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तांत्रिक अडचणींमुळे काहींना पैसे मिळाले नसले तरी ते मिळणार आहेत. आता फक्त राखी पौर्णिमा आणि भाऊबिजेला ओवाळणी मिळणार नाही, तर दर महिन्याला माहेरचा आहेर मिळणार आहे,’’ असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com