Banana Tissue Culture Agrowon
ॲग्रो विशेष

Tissue Culture Technology : फायदेशीर उती संवर्धन तंत्रज्ञान

Tissue Culture : उतिसंवर्धन तंत्रामध्ये वनस्पतीच्या जिवंत पेशी ठरावीक तापमान असलेल्या वृद्धी माध्यमात वाढविल्या जातात. पेशी, उती, इंद्रिये यांच्या संवर्धनासाठी घन, द्रव आणि अर्ध द्रव माध्यम वापरले जाते.

Team Agrowon

ऐश्वर्या उफाळे

Agriculture Technology : उतिसंवर्धन तंत्रामध्ये वनस्पतीच्या जिवंत पेशी ठरावीक तापमान असलेल्या वृद्धी माध्यमात वाढविल्या जातात. पेशी, उती, इंद्रिये यांच्या संवर्धनासाठी घन, द्रव आणि अर्ध द्रव माध्यम वापरले जाते.

पोषक द्रव्यात सर्वसाधारणपणे सोडियम आणि पोटॅशिअम आयन, ऊर्जेसाठी ग्लुकोज, प्रक्रियेसाठी विकरे, आवश्यक अमिनो आम्ल, काही संप्रेरक, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड मिश्रित हवा यांचे मिश्रण असते.

उती संवर्धनाचे विविध टप्पे आहेत. यामध्ये मातृवृक्षाची निवड आणि संगोपन केले जाते. त्यानंतर वनस्पतीच्या उतीचे निर्जंतुकीकरण आणि पोषक माध्यमावर रोपण केले जाते. हे कृत्रिम वातावरणात केले जाते.


ठरावीक दिवसाच्या अंतराने (२१ ते २८ दिवस) शाखीय फुटवे नव्याने तयार केलेल्या पोषक माध्यमात रोपण करून अधिकाधिक रोपे तयार केली जातात. सर्व रोपांच्या मुळ्यांचा विकास केला जातो. प्रयोगशाळेत तयार केलेल्या रोपांचे प्रथम हरितगृहात आणि नंतर शेडनेटगृहात टप्याटप्प्याने अनुकूलन घडवून आणले जाते.

अलीकडे संशोधनानुसार विविध तंत्राचा वापर करून कीटक आणि बुरशीरोधक पोषक द्रव्ये विकसित केली जातात. हे विशेष करून फळ, फुलांच्या उत्पादनासाठी केले जाते. विशिष्ट गुणधर्म असलेल्या वनस्पतींचे क्लोन तयार करण्यात येत आहेत. बिया नसलेली फळे, बियाणांच्या उत्पादनासाठी आवश्यक परागीभवन न करता अनेक वनस्पतींची निर्मिती होत आहे.

या तंत्रामध्ये एका पेशींपासून अनेक रोपांची निर्मिती करता येते.या तंत्रामुळे मजबूत, प्रतिरोधक रोपे तयार होत आहेत. या तंत्राद्वारे जरबेरा, स्ट्रॉबेरी, डाळिंब, केळी, पेरू, जांभूळ, बांबू, संत्रा, शेवंती, ऊस, बटाटा आदी पिकांच्या रोपांची निर्मिती होत आहे.

तंत्रज्ञानाचे फायदे ः
उती संवर्धन तंत्राचा साहाय्याने नवीन सुधारित जातींची निर्मिती आणि त्यांची शाखीय पद्धतीने अभिवृद्धी करता येते. कमीत कमी कालावधीत निवड केलेल्या मातृवृक्षापासून त्याचे आनुवंशिक गुण असलेली लाखो दर्जेदार रोपे तयार करता येतात. रोपे तयार करण्यासाठी विशिष्ट हंगामाची आवश्यकता असत नाही. ही रोपे विषाणू , जिवाणू आणि रोगमुक्त असतात. त्यामुळे पीक चांगले येण्याची आणि अपेक्षीत उत्पन्नाची हमी मिळते.


रोपे प्रयोगशाळेत तयार होत असल्यामुळे त्यांच्या उत्पादनांवर बाहेरील वातावरणाचा परिणाम होत नाही.
फळधारणा लवकर तसेच उत्कृष्ट प्रतीची असते. दुर्मीळ किंवा विशिष्ट गुणधर्मांचा जाती किंवा प्रगत जातींची कमी तापमानात उती संवर्धन पद्धतीने लागवड क्षमता टिकवून त्यांचे जतन करता येऊ शकते.
------------------------------------------
संपर्क ः ऐश्वर्या उफाळे,९४०५३५४५४०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT