Tissue Culture : टिश्यू कल्चरचे मृगजळ

ऊस, हळद, आले, टॅपिओका, खजूर, केळी, बांबू आदी पिकांचे बेणे महाग असते कारण त्यांचे उत्पादनही कमी असते. त्यामुळे अशा प्रकारच्या वनस्पतींची रोपे लक्षावधींच्या संख्येने उतिसंवर्धनाद्वारे बनवून ती विकणे हा एक किफायतशीर व्यवसाय होऊ शकेल, असे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले जाते.
Tissue Culture
Tissue CultureAgrowon

डॉ. आनंद कर्वे

ऊस (Sugarcane), हळद (Turmeric), आले, टॅपिओका, खजूर, केळी, बांबू (Bamboo) आदी पिकांचे बेणे महाग असते कारण त्यांचे उत्पादनही ()Production कमी असते. त्यामुळे अशा प्रकारच्या वनस्पतींची रोपे लक्षावधींच्या संख्येने उतिसंवर्धनाद्वारे बनवून ती विकणे हा एक किफायतशीर व्यवसाय होऊ शकेल, असे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले जाते. असाच प्रचार वर्तमानपत्रातील लेखांद्वारे किंवा तज्ज्ञांच्या भाषणांतूनही केला जाई.

एम.एस्सी. झालेल्या अनेक तरुणांनी यावर विश्‍वास ठेवून अशा प्रकारचे धंदे सुरू केले पण ते दिवाळ्यात गेले. सध्या महाराष्ट्रात उतिसंवर्धनाने गुणन केलेली फक्त केळीची रोपेच मोठ्या प्रमाणात विकली जातात. ती भरपूर महाग असतात; पण एकरी फक्त अडीच हजार रोपे लागतात आणि त्यापासून काही लाखांचे उत्पन्न मिळते म्हणून शेतकरी ती रोपे घेतात.

Tissue Culture
Solar Agricultural Pumps : सौर कृषिपंप देण्याच्या नावाखाली फसवणूक

उतिसंवर्धन अर्थात टिश्यू कल्चर म्हणजे वनस्पतींच्या किंवा प्राण्यांच्या पेशिका कृत्रिम माध्यमात वाढवणे. या लेखात आपण फक्त वनस्पतींचा विचार करणार आहोत. वनस्पतींच्या वृद्धिजनक संप्रेरकांचा शोध १९३० ते १९४०च्या दशकात लागला. काही पाश्‍चात्त्य वनस्पतिशास्त्रज्ञांनी १९४० ते ५०च्या दशकात वनस्पतींच्या पेशिका वनस्पतीपासून वेगळ्या काढल्या, त्यांना साखर, योग्य त्या खनिजघटकांचे क्षार आणि वृद्धिजनक संप्रेरक देऊन त्यांची वाढ परीक्षानळीमध्ये संपूर्णपणे कृत्रिम अशा माध्यमात करून दाखविली.

Tissue Culture
Agriculture Day : कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतीदिन साजरा

या पद्धतीने वाढविलेल्या पेशिकांपासून प्रथम एक पेशिकापुंज तयार होतो. या पेशिकापुंजावर आणखी काही संस्कार केले की त्या पेशिकापुंजापासून मूळ वनस्पतीची पुनर्निर्मिती करता येते. काही विशिष्ट प्रक्रियांद्वारे पेशिकापुंजातल्या प्रत्येक पेशिकेचे भ्रूणात रूपातर करता येणे शक्य आहे. त्यामुळे भ्रूणांची संख्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वनस्पतींची संख्या आपण वाटेल तेवढी वाढवू शकतो.

Tissue Culture
Agriculture Department : कृषी महोत्सवात शासनाचे स्टॉल उरले शोभेपुरते

वनस्पतीच्या जातीनुसार माध्यमातील पदार्थ, त्यांचे प्रमाण, कोणते संप्रेरक वापरावयाचे, माध्यम कोणत्या तापमानात ठेवायचे, त्याला दिवसाचा किती वेळ प्रकाश द्यायचा इ. घटकांवर प्रयोग करून कोणत्याही जातीच्या वनस्पतींचे उतिसंवर्धनाद्वारे गुणन कसे करावे हे माहिती करून घेता येते. या सर्व प्रक्रिया जंतुविरहित परिस्थितीत कराव्या लागतात. कारण माध्यमात साखर असल्याने त्यावर बॅक्टेरिया व बुरशी यांचीही वाढ होऊ शकते. १९६० ते १९७० या दशकात भारतातल्या अनेक प्रयोगशाळांमध्ये हे तंत्र वापरले जाऊ लागले आणि त्यात नवनवीन शोधही लागत गेले. सन १९७०च्या पुढे हे तंत्र खूपच विकसित झाले आणि ते भारतातल्या जवळ जवळ सर्व विद्यापीठांमध्ये वनस्पतिशास्त्राच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासही सुरुवात झाली.

Tissue Culture
Agricultural Mechanization : कृषी यांत्रिकीकरणात राज्याची देशात आघाडी

विद्यार्थ्यांना हे तंत्र शिकवताना या तंत्राचे फायदे काय हेही सांगण्यात येते. त्यातला एक मोठा फायदा असा सांगितला जातो, की या तंत्राने आपण अत्यंत कमी जागेत कोणत्याही वनस्पतीची लक्षावधी रोपे निर्माण करू शकतो. वनस्पतीची पुढची पिढी वाढवायची तर त्यासाठी त्या वनस्पतीचे बीज पेरणे हा सर्वात सोपा उपाय आहे. पण अनेक वनस्पतींमध्ये गुणनासाठी बीज न वापरता त्यांच्या कांड्या किंवा कंद अशा शाकीय अवयवांचाच बेणे म्हणून उपयोग केला जातो. उदा. ऊस, हळद, आले, टॅपिओका इ. किंवा कधी कधी त्या वनस्पतीच्याच तळातून उगविलेल्या पिलांचा उपयोग केला जातो. उदा. खजूर, केळी, बांबू, इ. बहुसंख्य शोभेच्या वनस्पतीसुद्धा काड्या किंवा कलमांद्वारेच वाढविल्या जातात.

वर उल्लेख केलेल्या वनस्पतींचे बेणे महाग असते कारण त्यांचे उत्पादनही कमी असते. त्यामुळे अशा प्रकारच्या वनस्पतींची रोपे लक्षावधींच्या संख्येने उतिसंवर्धनाद्वारे बनवून ती विकणे हा एक किफायतशीर व्यवसाय होऊ शकेल, असे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले जाते. असाच प्रचार वर्तमानपत्रातील लेखांद्वारे किंवा तज्ज्ञांच्या भाषणांतूनही केला जाई. एम.एस्सी. झालेल्या अनेक तरुणांनी यावर विश्‍वास ठेवून अशा प्रकारचे धंदे सुरू केले पण ते दिवाळ्यात गेले. सध्या महाराष्ट्रात उतिसंवर्धनाने गुणन केलेली फक्त केळीची रोपेच मोठ्या प्रमाणात विकली जातात. ती भरपूर महाग असतात; पण एकरी फक्त अडीच हजार रोपे लागतात आणि त्यापासून काही लाखांचे उत्पन्न मिळते म्हणून शेतकरी ती रोपे घेतात.

आमच्या आरती संस्थेने वनस्पतींच्या शाकीय गुणनाची अनेक नवी आणि कमी खर्चाची तंत्रे विकसित केली आहेत. त्यामुळे उतिसंवर्धनाचे अत्यंत महाग तंत्र वापरण्याची आता गरज राहिलेली नाही. उतिसंवर्धनाने आपण कमी जागेत जरी लक्षावधी रोपे निर्माण केली तरी एकेका रोपाची किंमत १० रुपयांच्या आसपास राहते. त्यामुळे उतिसंवर्धन हे वनस्पतींचे गुणन करण्याचे तंत्र नसून त्याचे खरे महत्त्व आहे ते वनस्पतिशास्त्र या विषयातील संशोधनाला मदत करणे. या विधानाला पुष्टी देणारा एक अनुभव मी खाली नमूद करीत आहे.

मी स्वतः उतिसंवर्धन या विषयावर कधीच काम केलेले नाही, पण पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीत (एनसीएल) उतिसंवर्धनावर संशोधन करणाऱ्या संशोधकांशी माझ्या गाठीभेटी होत असत. १९७०च्या दशकात मी फलटण येथील निंबकर अग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (नारी) शुगरबीट, ऊस आणि गोड ज्वारी या तीन शर्करा उत्पादक पिकांवर संशोधन करत असे. त्या वेळी महाराष्ट्रात उसाचे सर्वाधिक उत्पन्न को ७४० हे वाण देत असे; पण त्यावर मोझेक व्हायरस हा विषाणुजन्य रोग पडत असल्याने त्याच्या पानांवर पिवळ्या रंगाचे ठिपके दिसावयाचे. पण रोगग्रस्त असूनही जर हे वाण सर्वाधिक उत्पन्न देते तर मग या वाणाला आपण व्हायरसमुक्त करू शकलो तर त्याचे उत्पन्न आणखी वाढेल, असा विचार मी ‘एनसीएल''च्या संशोधकांना बोलून दाखवला होता.

वनस्पतींच्या खोडाची उंची त्याच्या वरच्या टोकाला असणाऱ्या पेशिकांच्या सततच्या विभाजनामुळे वाढते. वनस्पतीला जरी विषाणूची लागण झाली असली तरीही या अग्रस्थ पेशिका विषाणुमुक्त राहतात. या गुणधर्माचा फायदा घेऊन ‘एनसीएल''मधल्या संशोधकांनी ‘को ७४०’च्या अग्रस्थ पेशिकांचे संवर्धन करून त्यापासून विषाणुमुक्त रोपे तयार केली. ही रोपे आकाराने फारच लहान होती आणि ती आणखी दोन पिढ्या वाढवल्यावरच त्यांची खोडे नेहमीच्या उसाप्रमाणे जाड होत असत.

पण या मधल्या काळात त्याला पुन्हा विषाणूची लागण व्हायची. हा विषाणू मावा आणि तुडतुडे अशा किटकांमुळे पसरत असे. त्यामुळे उतिसंवर्धनातून बाहेर काढलेली रोपे कीटकमुक्त वातावरणात वाढवावी, असे मी सुचविले. पण ते काम मीच करावे, अशी ‘एनसीएल’ची अपेक्षा होती. म्हणून मी ती जबाबदारी स्वीकारली. त्यानुसार मी फलटणला आमच्या संस्थेत किटकाभेद्य असे एक हरितगृह उभे करून त्यात ही रोपे वाढविली. या हरितगृहात निर्माण केलेल्या बेण्याची चाचणी आम्ही आमच्या संस्थेच्या शेतात तर केलीच पण महाराष्ट्र शेती महामंडळाच्या शेतात आणि अन्य काही शेतकऱ्यांच्या शेतातही केली.

या सर्व प्रयोगांमधून असे दिसले, की व्हायरसमुक्त बेणे वापरल्याने ‘को ७४०''चे उत्पन्न सरासरी २० टक्क्यांनी वाढते; पण शेतात लावलेल्या उसाला पुन्हा व्हायरसची लागण होते. त्यामुळे पुढच्या हंगामात नव्या लागवडीसाठी शेतात वाढविलेले बेणे वापरता येणार नाही, हे आम्हाला कळून चुकले. म्हणजेच व्हायरसमुक्त बेणे निर्माण करण्यासाठी एक उतिसंवर्धन प्रयोगशाळा आणि ज्यात कीटक प्रवेश करू शकणार नाहीत, अशी हरितगृहे असा भांडवली खर्च केला तर व्हायरसमुक्त बेणे विक्रीचा एक मोठा धंदा करता आला असता. संस्थेकडे कीटकरोधक हरितगृह तर होतेच. त्याच्या जोडीला एक उतिसंवर्धन प्रयोगशाळा उभी करावयाची, असाही निर्णय संस्थेने घेतला होता. परंतु मध्यंतरीच्या काळात ‘को ७४०’ पेक्षा अधिक उत्पन्न देणारी नवी व्हायरसमुक्त वाणे निघाल्याने आमचे इरादे हवेतच विरले.

: ९८८१३०९६२३,

(लेखक ‘आरती’चे (अॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट-ARTI) संस्थापक अध्यक्ष आणि विश्‍वस्त आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com