Radhkrushna Vikhe - Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Shortage : चाराटंचाईमुळे आंतरजिल्हा वाहतुकीला बंदी : विखे पाटील

Scarcity of Fodder : माॅन्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने अहमदनगर जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे चाऱ्याच्या आंतरजिल्हा वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली

Team Agrowon

Ahmednagar News : नगर जिल्‍ह्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्‍याने परिस्थिती गंभीर बनली असून, खरिपाचेही काही अंशी क्षेत्र वाया गेले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर पशुधनाकरिता चार उपलब्‍ध करून देण्‍याचे आवाहन विचारात घेऊन आंतरजिल्हा चारा वाहतुकीवर बंदी घालण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सांगितले.

काकडी (ता. राहाता) येथे बुधवारी (ता. १६) सायंकाळी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. पावसाने दडी मारल्‍याने मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अद्यापही काही भागांत पावसाने हजेरीही लावलेली नाही.

अनेक जिल्‍ह्यांमध्‍ये ठरावीक क्षेत्रातच पाऊस झाल्याने परि‍स्थिती गंभीर आहे. नगर आणि मराठवाड्यात फारशी वेगळी परिस्थिती नाही. धरणातील पाणी पिण्‍यासाठी आरक्षित करावे लागेल. या सगळ्या परिस्थितीवर मंत्रिमंडळाच्‍या बैठकीत विस्‍ताराने चर्चा होऊन शासन योग्‍य पावले उचलणार आहे.

प्रामुख्‍याने पशुधनासाठी चारा उपलब्‍धतेचे मोठे आव्‍हान असून, यासाठी सरकारच्‍या वतीने नवीन धोरण आणणार आहे. परंतु तातडीचा उपाय म्‍हणून आंतरजिल्हा चारा वाहतुकीला बंदी घालण्‍याचा निर्णय घेतला आहे.

यामध्‍ये आणखी एक पाऊल पुढे टाकून ज्‍या भागामध्‍ये पाणी आहे, त्‍या ठिकाणी शेतकरी चारा पिके घेणार असतील, तर शासन हा उत्‍पादित झालेला चारा शेतकऱ्यांकडून विकत घेण्‍यास तयार आहे. यासाठी चारा खरेदीचे दरही निश्‍चित करण्‍यात येईल.

लम्पी आजाराच्‍या बाबतीत विभागाच्‍या अधिकाऱ्यांना पुन्‍हा नव्‍याने सूचना देण्‍यात आल्‍या असून, आमचे सर्व अधिकारी पुन्‍हा गावपातळीवर जाऊन लम्पी स्कीन आजाराबाबत उपाययोजना करीत आहेत. राज्‍यात लसीचा दुसरा डोस देण्‍याची माहिती सुरू झाली असून, ५५ टक्‍के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असल्‍याकडे लक्ष वेधून, नागपूर येथील महाराष्‍ट्र पशू व मत्‍स्य विज्ञान विद्यापीठाच्‍या तज्‍ज्ञांनाही या आजारावर तातडीने उपाययोजना करण्‍याबाबत सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.

केंद्र सरकारचेही पथक लवकरच राज्‍यास भेट देणार असून, सातत्‍याने येत असलेल्‍या लम्पी साथरोगावर नियंत्रण आणण्‍याच्‍या दृष्‍टीने त्‍यांच्‍याकडूनही उपाय योजनांबाबत मार्गदर्शन घेणार असल्‍याचे विखे पाटील म्‍हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hawaman Andaj: शिवपुरीत निचांकी तापमानाची नोंद; राज्यातील बहुतांशी ठिकाणी तापमानात चढ उतार सुरुच

Farmers Relief: बँकांनी कर्जाचे पुनर्गठन करून सहकार्य करावे

NAFED Soybean Procurement: नाफेड प्रमुख भव्या आनंद यांची शेतकरी कंपनीच्या मॉडेल खरेदी केंद्राला भेट

Forest Land Verdict : वन जमिनीवर शेती करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

Rural Development: सर्वार्थाने आदर्श गाव निर्मितीचा संकल्प करूया : कुलगुरू डॉ. गडाख

SCROLL FOR NEXT