
Maharashtra Monsoon 2023 Update : ऑगस्ट महिन्यात केवळ राज्यात नाही तर देशातही पावसाने चिंता वाढवली. देशात ऑगस्ट महन्यात तब्बल ३६ टक्के कमी पाऊस झाला. तर महाराष्ट्रातील पाऊसमान तब्बल ७० टक्क्यांपर्यंत कमी आहे. राज्यातील केवळ एक जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त तूट आहे.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप आहे. देशातही पावसाचा खंड आहे. माॅन्सून सध्या हिमालयाच्या पायथ्याशी रेंगाळताना दिसतो. देशात पाऊस नसला तरी खरिप पिकांबाबत चिंताजनक स्थिती नाही, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या काळात सरासरी केवळ ८६ टक्के पाऊस पडला. तर या १४ दिवसांमधील सरासरी पाऊस १३३ मिलिमीटर असतो.
विभागनिहाय पावासाचा विचार करता, दक्षिण द्वीपकल्पात केवळ ३० मिलिमीटर पाऊस झाला. म्हणजेच या भागात ७० टक्क्यांनी पाऊसमान कमी आहे. मध्य भारतात ९३ मिलिमीटरची नोंद झाली. सरासरीपेक्षा हा पाऊस ४३ टक्क्यांनी कमी दिसतो. दुसरीकडे पूर्व आणि ईशान्य भारतात सरीसरीपेक्षा जास्त आहे. या भागात १७७ मिलिमीटर पाऊस झाला. सरासरीपेक्षा हा पाऊस ८ टक्क्यांनी जास्त आहे.
बिहारमध्ये जास्त पाऊस
बिहारमध्ये ऑगस्टमधील १४ दिवसांमध्ये सरासरीपेक्षा ३६ टक्के जास्त पाऊस झाला. पण पूर्व उत्तर प्रदेशात २३ टक्के कमी पाऊस आहे. पूर्व उत्तरप्रदेशात राज्यातील एकूण ७५ जिल्ह्यांपैकी ४२ जिल्ह्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील तूट जास्त
महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत तब्बल ७० टक्के कमी पाऊस पडला. म्हणजेच राज्यात केवळ ३० टक्के पावसाची नोंद झाली. राज्यात केवळ वाशीम जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद आहे. तसेच धाराशिव, सोलापूर आणि नगर जिल्ह्यात ऑगस्टमध्ये पाऊसच झाला नाही. इतर जिल्ह्यांमध्ये पावसात तूट दिसते. नंदूरबार, धुळे, बीड, बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात कमी आहे. म्हणजेच अगदी थोडा पाऊस पडला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.