Satara Water Shortage : सातारा जिल्ह्यातील माण, खटाव तालुक्यात पाणी टंचाई, चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

Satara Man Khatav Taluka : सातारा जिल्ह्यातील माण व खटाव तालुक्यातील बहुतांश भागामध्ये कमी पाऊस पडल्यामुळे तिथे दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली आहे.
Satara Water shortage
Satara Water shortageAgrowon
Published on
Updated on

Satara News : यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पिकांबरोबर आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. सातारा जिल्ह्यातील माण व खटाव तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने पाण्याची मोठी समस्या निर्णाण होण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर त्या भागातील लोकांनी जनावरांच्या चाऱ्यासह पाण्याची सोय करावी अशी मागणी केली आहे.

सातारा जिल्ह्यातील माण व खटाव तालुक्यातील बहुतांश भागामध्ये कमी पाऊस पडल्यामुळे तिथे दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली आहे. या गावांमध्ये जनावरांना चारा व पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

यावर तात्काळ चारा छावण्या सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री व मदत-पुनर्वसन मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सातारा जिल्ह्यात सर्वत्र सरासरी पाऊस पडला असला तरी माण व खटाव तालुक्यातील बहुतांश भागामध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने या भागात दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली आहे.

माण व खटाव तालुक्यातील दुष्काळजन्य गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार सदर गावांमध्ये तत्काळ चारा छावण्या सुरु करण्याची मागणी होत आहे. तसेच पशुधन वाचविण्यासाठी या दुष्काळग्रस्त भागात त्वरित चारा छावण्या सुरु करण्याकरिता चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवले आहे.

Satara Water shortage
Tomato Price : आता मिळणार टोमॅटो ५० रुपये किलोने, सरकारचा निर्णय

एकीकडे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असून काल (ता.१६) महाबळेश्वरला सर्वाधिक ५३ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर कोयना क्षेत्रातही पाऊस पडत असल्याने धरणात आवक वाढली आहे. धरणसाठा ८३.७३ टीएमसीवर गेला आहे. तर धरणातील विसर्ग अजून बंदच आहे.

पश्चिम भागात मागील आठवडाभर पावसाची उघडझाप सुरू होती. तसेच काही भागात पावसाची दडी होती. मात्र, शनिवारपासून चांगल्या पावसाला सुरूवात झाली. रविवारीही कोयनानगरसह नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणेाली भागात चांगलाच बरसला. त्यामुळे पावसाचा रुसवा गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पावसामुळे पुन्हा ओढे, ओहोळ भरुन वाहू लागले आहेत. तसेच भात खाचरातही पाणी साचल्याने भात पिकाला फायदा होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com