Nashik News: आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या ‘शबरी नॅचरल्स’ या प्रीमियम ब्रँड अंतर्गत वेणुशिल्पी औद्योगिक सहकारी संस्थेने तयार केलेल्या राख्यांनी अल्पावधीतच देश-विदेशात लोकप्रियता मिळवली आहे. या राख्या shabarinaturals.com या वेब पोर्टलवर उपलब्ध होताच इंग्लंडच्या काही रहिवाशांनी राख्यांची मागणी नोंदवली आहे.
लवादा (मेळघाट, पो. दुनी, ता. धारणी, जि.अमरावती) येथील वेणुशिल्पी संस्थेला आदिवासी महामंडळाअंतर्गत अनुदान आणि कर्ज देऊन पाठबळ दिले. या संस्थेच्या आदिवासी कारागीर बांधवांकडून बांबूच्या राख्या तयार केल्या जातात. याशिवाय बांबूपासून इतर आकर्षक हस्तकला उत्पादनेही तयार केली जातात.
तयार केलेल्या राख्या शबरी नॅचरल्सच्या माध्यमातून एका क्लिकवर जगभर उपलब्ध होत आहेत. आदिवासी बांधवांच्या कलेमुळे त्यांची संस्कृती जगभर पोहोचली जात आहे. आदिवासी विकास भवन येथून किंवा shabarinaturals.com या संकेतस्थळावरून राख्या विकत घेण्याचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी केले आहे.
राख्या बनविणाऱ्या कारागिरांची कहाणी
राधा कृष्णा मसाने (भिलाला आदिवासी, मु. चित्री, ता. धारणी,जि.अमरावती) : गेल्या पाच वर्षांपासून राख्या, इलेक्ट्रिक माळा आणि इतर हस्तकला बनवतात. त्यांनी बनवलेल्या राखीला ‘राधा राखी’ असे नाव देण्यात आले आहे. त्या वेणुशिल्पी संस्थेच्या सदस्य आणि प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत.
गोरेलाल अहिर्या (भिलाला आदिवासी, मु. काटकुंभ, ता. धारणी, जि.अमरावती) : गोरेलाल पायाने दिव्यांग असूनही १९ वर्षांपासून बांबू हस्तकलेतून ते आपला चरितार्थ चालवत आहेत. त्यांनी बनवलेली ‘अंगठी राखी’ लोकप्रिय आहे. त्यांची दिव्यांग पत्नी शांतीदेखील संस्थेत बांबूचे कार्य करते. गोरेलाल मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
सोहनलाल रामलाल कासदेकर(मु. घोटा, ता. धारणी, जि.अमरावती) : संस्थेचे कोषाध्यक्ष असलेले सोहनलाल दोन्ही पायांनी दिव्यांग आहेत. गेल्या १३ वर्षांपासून ते बांबू हस्तकलेतून नियमित उत्पन्न मिळवतात. त्यांनी बनवलेली ‘मोर राखी’ आणि डिझायनिंगमधील योगदान उल्लेखनीय आहे.
रामलीला सोहनलाल कासदेकर (मु. घोटा, ता. धारणी, जि.अमरावती) : रामलीला ही पती सोहनलाल यांच्याकडून बांबू हस्तकला शिकली. गेल्या ७ वर्षांपासून त्या बांबूपासून वस्तू बनवून उदरनिर्वाह करतात. त्यांनी बनवलेल्या राखीला ‘रामलीला राखी’ असे नाव देण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.