Jalgaon News: खानदेशात तेलबियांची पेरणी स्थिर आहे. पावसामुळे सूर्यफूल पेरणी रखडली आहे. या महिन्यात भुईमूग पेरणी बऱ्यापैकी होईल, असे दिसत आहे. खानदेशात भुईमुगाची पेरणी सुमारे ७०० हेक्टरवर आहे. तीळ पेरणी सुमारे ३५० हेक्टरवर आहे. .सोयाबीनची पेरणी सुमारे ३० हजार हेक्टरवर आहे. जळगाव जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी सुमारे २२ हजार हेक्टरवर झाली आहे. सूर्यफूल पेरणी काही भागांत झाली आहे. तर काही भागांत पेरणी रखडली आहे. अनेक शेतकरी उशिराने सूर्यफूल पेरणी करतात..Oilseed Sowing : बारामतीत सूर्यफूल, करडईच्या पेरणीसाठी लक्ष्यांक.ही पेरणी पुढील काही दिवसांत होईल. यंदा क्षेत्रात किंचित वाढ होईल, असे चित्र आहे.आगाप भुईमुगाची पेरणी जुलैत अनेकांनी केली आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात भुईमूग पेरणीला वेग आला. मागील वेळेसही जुलैत भुईमूग पेरणी गतीने सुरू झाली होती..अनेकांनी पेरणी जुलैच्या मध्यातही केली आहे. टोकन पद्धतीने कमाल क्षेत्रात लागवड झाली आहे. सर्वाधिक पेरणी जुलैतच झाली आहे. खानदेशात भुईमुगाची पेरणी जुलैअखेरपर्यंत केली जाते. शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना पसंती देतात. .Oilseeds Sowing : तेलबियांची दोन हजार हेक्टरवर पेरणी.मागील हंगामात खानदेशात सुमारे ८०० हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली होती. यंदा ही पेरणी सुमारे ७०० हेक्टरवर झाली आहे. मागील वेळेस पाऊसमान बऱ्यापैकी होते. जळगाव जिल्ह्यातील पश्चिम भागात पेरणी कमी आहे..पण यंदा जुलैत जळगाव जिल्ह्यात पावसाची तूट होती. धुळ्यात २० टक्के व नंदुरबारमध्येही सुमारे २० टक्के कमी पाऊस झाला होता. याचा फटका तेलबिया पिकांना बसला आहे. सोयाबीन पीक पक्व होत आहे. त्याची मळणी पुढील पंधरवड्यात सुरू होऊ शकते. .Oilseed Sowing : खानदेशात तेलबिया पेरणी स्थिर राहणार.सूर्यफुलासाठी सिंचनाची व्यवस्थासूर्यफुलासह भुईमुगाची पेरणी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जामनेर, भडगाव, एरंडोल, धुळ्यातील साक्री, धुळे, नंदुरबारमधील शहादा, नवापूर, नंदुरबार भागांतही होईल. कारण आता पाऊसमान चांगले आहे..पेरणीनंतर पुढील महिन्यात अधिकृतपणे पावसाळा संपणार आहे. परतीचा पाऊस लांबल्यास त्याचा लाभ पिकास होईल किंवा सिंचन करण्याची गरज नसणार. पण शेतकरी सिंचनाची व्यवस्था सूर्यफुलासंबंधी करीत आहेत. कारण अनेकदा सप्टेंबरअखेरीस पाऊस बंद होतो. .सातपुड्यालगत क्षेत्र स्थिर राहणारखानदेशात जळगावातील गिरणा पट्टा, धुळ्यातील धुळे, साक्री आदी भागांत सूर्यफुलाची अधिक पेरणी होईल. तसेच सातपुड्यालगत जळगावातील यावल, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा भागात पेरणी स्थिर असणार आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव, जामनेर, एरंडोल, चोपडा तालुक्यात सर्वाधिक पेरणी होईल, अशी माहिती आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.