Sub Divisional Agriculture Officer Vishwas Barve Agrowon
ॲग्रो विशेष

Bamboo Farming : बांबू पीक लागवड किफायतशीर

Sub Divisional Agriculture Officer Vishwas Barve : तालुक्यातील काही पडीक जमीन बांबू लागवडीसाठी चांगली आहे. बांबूसाठी शासकीय अनुदान मिळत असून त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा.

Team Agrowon

Palghar News : तालुक्यातील काही पडीक जमीन बांबू लागवडीसाठी चांगली आहे. बांबूसाठी शासकीय अनुदान मिळत असून त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी विश्वास बर्वे यांनी केले.

सफाळे येथील परिसर सेवा व विकास मंडळ आणि पालघर तालुका कृषी विभागातर्फे बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. या शिबिरात उपविभागीय कृषी अधिकारी विश्वास बर्वे यांनी बांबू लागवडीसाठी लागणारी जमीन, लागवड पद्धती, शासकीय अनुदान, सलग लागवड, बांधावर लागवड याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.

पालघर कृषी संशोधन केंद्राचे अधिकारी डॉ. दहिफळे यांनी, बांबू कीड व रोग न लागणारी वनस्पती असून निसर्गाचे संवर्धन करणारी जात आहे. बांबूच्या सुमारे ३०० जाती असून त्यापैकी माणगाव ही जात उत्कृष्ट असून चांगले उत्पन्न देणारी जात आहे. या बांबू लागवडीसाठी आपल्या परिसरातील जमीन वातावरण पोषक आहे. शेतकऱ्यांना सदन करणारे म्हणजे बांबूचे पीक आहे. या बांबूची वाढ पाच वर्षांनी पूर्ण होते. या लागवडीसाठी माती परीक्षण करण्याची गरज आहे, तेही सरकारकडून केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

सफाळे परिसरातील शेतकरी भूषण वर्तक यांनी खत, माती भरून तीनशे खड्डे तयार केले आहेत. त्यासाठी त्यांना बांबूची रोपे मिळणे अडचणीचे झाले होते. त्यावर त्यांची ही अडचण दूर केली जाईल आणि त्यांना बांबू लागवडीसाठी सहकार्य केले जाईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन परिसर सेवा विकास मंडळाचे अध्यक्ष चिंचामण ठाकूर यांनी केले होते. मंडळाचे उपाध्यक्ष नितीन वर्तक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

रानडुकरांकडून नुकसान

पालघर किनारपट्टीवरील बागायतीचे रानडुकरांनी शेतकऱ्यांना हैराण केले आहे. केळी, सुरण, आळू, भात आदी पिकांचे नुकसान डुकरे करत आहेत. यावर उपाययोजना करावी, अशी येथील शेतकऱ्यांनी मागणी केली. यावर तोडगा काढण्याचा उपाय कृषी विभागाने सांगितला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

SCROLL FOR NEXT