Bamboo Cultivation : बांबू लागवडीसाठी जुलैपासून होणार सुरुवात

Collector Dr. Vipin Itankar : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बांबू लागवड कार्यक्रमाला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हा परिषद, कृषी, सिंचन, सामाजिक वनीकरण विभागाने परस्पर समन्वयातून बांबू रोप लागवडीकडे वळले पाहिजे.
Collector Dr. Vipin Itankar
Collector Dr. Vipin ItankarAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बांबू लागवड कार्यक्रमाला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हा परिषद, कृषी, सिंचन, सामाजिक वनीकरण विभागाने परस्पर समन्वयातून बांबू रोप लागवडीकडे वळले पाहिजे. जुलै महिन्यात या कार्यक्रमांतर्गत संपूर्ण जिल्हाभर बांबू लागवड अभियानाचा शुभारंभ केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिली.

Collector Dr. Vipin Itankar
Bamboo Farming : बुलडाणा जिल्ह्यात होणार २० हजार हेक्टरवर बांबू शेती

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात बांबू लागवड २०२४-२५ अभियानासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, उपवन संरक्षक भारतसिंह हाडा, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना कडू, जिल्हा जलसंधारण अधिकारी बी. व्ही. सयाम, सामाजिक वनीकरण, सिंचन तसेच संबंधित विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

Collector Dr. Vipin Itankar
Bamboo Cultivation : पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी बांबू लागवडीस प्राधान्य द्यावे

जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, कृषी विभाग, नगर परिषद, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत असलेल्या शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रातील जागांवर बांबू लागवडीसाठी मोठी संधी आहे. याच बरोबर शेतकऱ्यांनीही आपल्या शेत जमिनीच्या बांधावर बांबू लागवड केल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. बांबू लागवडीकडे व्यापक लोकसहभागातून नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीचे उद्दिष्ट साध्य करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सामाजिक वनीकरण विभागाकडे बांबूची रोपे उपलब्ध आहेत. ही रोपे जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या ४७ निवडक तलावांच्या परिसरात लावली जाणार आहेत. एकूण ४०० हेक्टर क्षेत्रापैकी १५० हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीची जबाबदारी कृषी विभागाने तर सुमारे ३०० हेक्टर जमिनीवर जिल्हा परिषदेने स्वीकारली आहे. नगर परिषदेअंतर्गत असलेल्या डंपिंग ग्राऊंडवर बांबू लागवडीसाठी मुख्याधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com