sandeep Shirguppe
कोल्हापूर जिल्ह्यात बांबू लागवडीसाठी महसूल विभागाकडून प्रोत्साहन दिले जात आहे.
रोजगार हमी योजनेतून रोप, मजुरीच्या रूपाने लाभार्थीस तीन वर्षांपर्यंत ६ लाख ९० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
वैयक्तिक किंवा शासकीय जमिनीवर बांबू लागवड करण्यासाठी अनुदान मिळते. यासाठी रोजगार हमी योजनेतून अर्ज करावा लागतो.
पात्र लाभार्थीस तीन वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने ६ लाख १० हजार रुपयांचे अनुदान एका हेक्टरला मजुरांच्या खात्यावर जमा केले जाते.
अटल बांबू समृद्धी योजनेंतर्गत महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून अनुदानावर बांबू लागवड करता येते.
वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादित कंपन्या आणि संस्था, समूह अर्ज करू शकतात. याशिवाय शासकीय जमिनीवरही बांबू लागवड करता येते.
अर्जासोबत आधार कार्ड, शेतकरी असल्यास सात-बारा, आठ अ. बँक पासबुकची झेरॉक्स
शेतकरी बांबू लागवड केल्यानंतर त्याला दर मिळत नाही, तोडणी, बाजारपेठेत नेणे हा सर्व खर्च वजा नफा फारसा राहत नसल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.