Bahiram Yatra Agrowon
ॲग्रो विशेष

Bahiram Yatra : बहिरम यात्रेस आजपासून प्रारंभ

Religious Event : संपूर्ण राज्यामध्ये दीर्घकाळ चालणारी बहिरम यात्रेचा २० डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर दुकानांसाठी लागणाऱ्या जागेचा लिलाव काही दिवसांपूर्वीच झाला.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News : संपूर्ण राज्यामध्ये दीर्घकाळ चालणारी बहिरम यात्रेचा २० डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर दुकानांसाठी लागणाऱ्या जागेचा लिलाव काही दिवसांपूर्वीच झाला. आता शुक्रवारी श्रीक्षेत्र बहिरम यात्रेचा नारळ फुटणार असून, प्रशासनाच्या वतीने भाविकांना व व्यावसायिकांना सोईसुविधा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर सातपुड्याच्या पायथ्याशी सव्वा महिना चालणारी ही यात्रा थंडीच्या काळात येत असल्यामुळे येथे हंडी मटण बनविले जाते. या भागातील नागरिकांचे कुलदैवत बहिरम बुवा मानला जात असून, आदिवासी बांधवांमध्ये देखील बहिरम बाबाला मानाने पुजले जाते. यामुळे या यात्रेमध्ये आदिवासी बांधवांची देखील मोठी गर्दी असते. शेतीला लागणारे साहित्य या यात्रेत मोठ्या प्रमाणात विकायला येत असल्याने शेतकरी वर्ग देखील यात्रेकडे आकर्षिला जात असतो.

या यात्रेमध्ये महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेशातील अनेक भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी येतात. शनिवार व रविवार या दोन दिवशी यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. यात्रेतील काही दुकाने लागण्यास आता सुरुवात झाली आहे. सुलभ शौचालयाची व्यवस्था दोन ठिकाणी करण्यात आली, तर कारंजा रोडवरील जागेवर राहुट्याधारक राहुट्या उभारण्यात मग्न झालेले दिसून येत आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत विविध साहित्यांची दुकाने, हॉटेल, आकाश पाळणे आदी मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहेत.

दीड महिना चालणाऱ्या यात्रेसाठी मंदिर संस्थानच्या वतीने पिण्याचे पाणी, पार्किंगची व्यवस्था त्याचप्रमाणे दर्शनासाठी महिला व पुरुषांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. मंदिरावर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. शुक्रवारी (ता. २०) होमहवन झाल्यानंतर नैवेद्य दाखवून यात्रेला सुरुवात होईल.
सुरेंद्र चौधरी अध्यक्ष, श्री बहिरम बाबा संस्थान
संपूर्ण यात्रेवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. त्याचप्रमाणे दोन पोलिस निरीक्षक यांच्यासोबत शंभराच्या वर यात्रेदरम्यान पोलिस बंदोबस्त राहणार आहे. तसेच सीमा भागावर विशेष लक्ष राहणार आहे.
महेंद्र गवई, ठाणेदार, शिरजगाव कसबा पोलिस, ठाणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain: कोकण, मध्य महाराष्ट्रात मॉन्सूनची आगेकूच

Maharashtra Rain Alert: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार सरींची शक्यता

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

SCROLL FOR NEXT