Maharashtra Rain Update: नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आगेकूच केली आहे. सोमवारी (ता. ८) मॉन्सूनने रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूरपर्यंत मजल मारली. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्याच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. .आगमन दीर्घकालीन वेळेपेक्षा तीन दिवस लांबल्यानंतर ४ जून मॉन्सून देवभूमी केरळमध्ये डेरे दाखल झाला. मॉन्सूनच्या प्रवाहाची गती वाढल्याने दुसऱ्याच दिवशी कर्नाटक किनारपट्टी गोव्यापर्यंतचा टप्पा गाठला. शनिवारी (ता. ६) मॉन्सून एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल झाली. केरळमध्ये उशिराने येणाऱ्या मॉन्सूनचे महाराष्ट्रातील आगमन यंदा एक दिवस आधीच झाले आहे..Monsoon Alert: माॅन्सून सोलापूरपर्यंत आला; विदर्भात पुढील ५ दिवस वादळी पावसाची शक्यता.रविवारी (ता. ७) मॉन्सूनच्या बंगालच्या उपसागरावरील शाखेने पुढे चाल करत संपूर्ण नागालँड, मणिपूर, मिझोराम राज्य व्यापले असून, त्रिपुरा, आसाम, अरुणाचल प्रदेशच्या काही भागात प्रगती केली होती..Monsoon Arrival: पंधरा जूनपर्यंत सर्वत्र पावसाचा जोर कमी.सोमवारी (ता.९) मॉन्सूनने संपूर्ण सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली व्यापून रत्नागिरी, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांचा काही भागात चाल केली आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही मॉन्सूनने प्रगती केली आहे. मॉन्सूनने हर्णे, सोलापूर, कलबुर्गी, नंद्याल, चेन्नई तसेच ईशान्य भारतातील केलाशहर, लामडिंग, उत्तर लखीमपूरपर्यंत प्रगती केली आहे..पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भागासह, संपूर्ण तमिळनाडू आणि ईशान्य भारत व्यापून, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम राज्यात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.