Jotiba Yatra Kolhapur : अखंड उत्साहात लाखो भाविकांच्या उपस्थितीत दख्खनचा राजा जोतिबा यात्रेस प्रारंभ

Jotiba Mandir : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी चैत्र यात्रेच्या मुख्य दिवशी मंगळवारी (ता.२३) देशभरातून लाखो भाविकांची गर्दी उसळली.
Jotiba Yatra Kolhapur
Jotiba Yatra Kolhapuragrowon

Kolhapur Jotiba Yatra : महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू या राज्यात महत्वाची मानली जाणाऱ्या दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा मंगळवारी(ता.२३) अमाप उत्साहात पार पडली. कडाक्याच्या उन्हाची तमा न करता दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी चैत्र यात्रेच्या आज मुख्य दिवशी देशभरातून लाखो भाविकांची गर्दी झाली आहे. वाडी रत्नागिरी येथील जोतिबाचा डोंगर भक्तांच्या अलोट गर्दीने फुलून गेला.

जोतिबाच्या नावाने चांगभलंचा अखंड गजर करत चैत्र यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठया जोतिबा डोंगरावर दाखल झाल्या. चांगभलंच्या गजराने अवघा जोतिबाचा डोंगर दुमदुमून गेला. डोंगर वाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या. बैलगाडी, खाजगी वाहनातून पायी चालत भाविक जोतिबा डोंगरावर आले होते. कडाक्याच्या उन्हातही लोक उत्साहाने पायी दर्शनासाठी जात होते.

जोतिबा मंदिरात पहाटे तीन पासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ झाला. पाच वाजता शासकीय महाभिषेक झाला. दहा वाजता धुपारती सोहळा झाला. दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे हस्ते मानाच्या पहिल्या सासनकाठीच्या पुजनाने मिरवणुकीस प्रारंभ झाला.

गुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण, प्रचंड उंचीच्या फुला माळांनी सजवलेल्या शासन काठ्या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते. भर उन्हात तरुण वर्ग, गुलालात चिंब होऊन नाचत होता. मुखात जोतिबाच्या नावानं चांगभलचा अखंड गजर करत भाविक सासनकाठ्या नाचवण्यात मग्न झाले.

Jotiba Yatra Kolhapur
Kolhapur Jotiba Temple : जोतिबाच्या नावानं चांगभलं, लाखो भाविकांच्या उत्साहात जोतिबा यात्रा संपन्न

मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान पाडळी (जि.सातारा) या सासनकाठीचा,त्यानंतर मौजे विहे (ता.पाटण), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता.मिरज), कसबा सांगाव (ता.कागल), किवळ (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली) यांच्या मानाच्या एकूण १०८ सासनकाठ्या सहभागी झाल्या.

हस्तनक्षत्रावर सायंकाळी पावणे सहा वाजता श्री. जोतिबाचा पालखी सोहळा निघणार आहे. यावेळी तोफेच्या सलामीने जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे पालखी मार्गस्थ होईल. सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात यमाईदेवी व जमदग्नी यांच्या विवाह सोहळ्याचा धार्मिक विधी पार पडणार आहे. श्री जोतिबा मंदिरात येऊन तोफेच्या सलामीने रात्री दहा वाजता पालखी सोहळ्याची सांगता होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com