Bahiram Yatra : बहिरम यात्रेचा बिगुल वाजला

शेकडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र बहिरम येथे विधिवत पूजा करण्यात आली. दरवर्षी २० डिसेंबरला या ठिकाणी पूजा करण्यात येते.
Bahiram Yatra
Bahiram YatraAgrowon

करजगाव, जि. अमरावती : शेकडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र बहिरम (Bahiram) येथे विधिवत पूजा करण्यात आली. दरवर्षी २० डिसेंबरला या ठिकाणी पूजा करण्यात येते. सर्वप्रथम बहिरमबुवाच्या (Bahiram Yatra) मूर्तीला शेंदूर, दूध-दही, मध व लोण्याचा अभिषेक करण्यात आला.

Bahiram Yatra
Agriculture Subsidy : आता मिळवा शेती विकत घेण्यासाठी अनुदान

पूजेनंतर मंदिरासमोरील यज्ञात पूर्णाहुती देण्यात आली. होमहवन व आरती करून रोडग्याचा नैवेद्य बहिरमबुवाला दाखवण्यात आला. त्यानंतर शंखनाद करून यात्रेचे नारळ फुटले.

Bahiram Yatra
Agriculture Export : शेतीमालाची निर्यात जलदगतीने करणार : गडकरी

बहिरमबाबांच्या दर्शनाला दरवर्षी हजारो भाविक येतात. विदर्भातच नव्हे तर संपूर्ण राज्यात ही यात्रा प्रसिद्ध असल्याने भक्तमंडळी सलग दीड महिना देवदर्शन व यात्रेचा लाभ घेते. मंगळवारी (ता. २०) बहिरम बुवाच्या महापूजेला सुरुवात झाली. शिव मंदिर, हनुमान मंदिर, महागणपती मंदिर याठिकाणी अभिषेक करण्यात आला. संपूर्ण सोहळ्याला संस्थानचे अध्यक्ष सुरेंद्र चौधरी, विश्‍वस्त मंडळी, संस्थेचे व्यवस्थापक पिंटू ठाकरे व सुनील ठाकरे उपस्थित होते.

सलग दोन वर्षांच्या बंदीनंतर या वर्षी बहिरमबाबाची यात्रा भरली आहे. भक्तांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. महिला व पुरुषांची दर्शनाची वेगवेगळी व्यवस्था केली आहे. सर्व भाविकांनी शांततेने दर्शन घेऊ संस्थेला व दर्शन समितीला सहकार्य करावे.

- सुरेंद्र चौधरी, अध्यक्ष, बहिरमबाबा संस्थान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com